इन्द्र कुमार गुजराल
इन्द्र कुमार गुजराल भारताचे तेरावे पंतप्रधान होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सक्रीय सहभाग घेतला होता आणि १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाच्या दरम्यान ते तुरुंगात देखील गेले होते. एप्रिल १९९७ मध्ये भारताचे पंतप्रधान होण्याआधी त्यांनी केंद्रीय मंत्रीमंडळात विविध पदांवर काम केले. ते दूरसंचार मंत्री, संसदीय कार्य मंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्री, विदेश मंत्री आणि गृहनिर्माण मंत्री अशा महत्वाच्या पदांवर राहिले. राजकारणात येण्यापूर्वी काही काळ त्यांनी बी.बी.सी. च्या हिंदी सेवेत एक पत्रकार म्हणून देखील काम केले होते.
हिंदी, उर्दू आणि पंजाबी भाषेत निपुण असण्यासोबतच त्यांना इतर अनेक भाषा अवगत होत्या, आणि त्यांना शायरी देखील फार आवडत असे. त्यांची पत्नी शीला गुजराल यांचे निधन ११ जुलै २०११ रोजी झाले. त्याचे दोन मुलगे नरेश आणि विशाल पैकी नरेश गुजराल राज्यसभा सदस्य आहे. त्यांचे छोटे बंधू सातीश गुजराल एक प्रसिद्ध चित्रकार आणि वास्तुतज्ञ आहेत.
३० नोव्हेंबर २०१२ रोजी गुडगाव मधील मेदांता हॉस्पिटलमध्ये इंद्रकुमार गुजराल यांचे निधन झाले.