Android app on Google Play

 

पी॰ व्ही॰ नरसिंह राव

 

https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/bb/P_V_Narasimha_Rao.png/192px-P_V_Narasimha_Rao.png

पामुलापती वेंकट नरसिंह राव भारताचे नववे पंतप्रधान होते. "लायसेन्स राज"ची समाप्ती आणि भारतीय अर्थव्यवस्थेत खुलेपणा त्यांच्याच राजवटी दरम्यान चालू झाले. ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री देखील होते.
त्यांच्या पंतप्रधान होण्यात नशिबाचा खूप मोठा हात राहीला आहे. २९ मे १९९१ रोजी राजीव गांधींची हत्या झाली होती. अशामध्ये सहानुभूतीच्या लाटेचा कॉंग्रेसला निश्चितच फायदा झाला. १९९१ ची निवडणूक २ चरणांत झाली होती. प्रथम चरणातील निवडणुका राजीव गांधींची हत्या होण्यापूर्वी झाल्या आणि द्वितीय चरणातील निवडणुका हत्येच्या नंतर. पहिल्या चरणाच्या तुलनेत दुसऱ्या चरणात कॉंग्रेसचे प्रदर्शन चांगले झाले. याचे मुख्य कारण राजीव गांधींच्या हत्येमुळे उसळलेली सहानुभूतीची लाट होती. या निवडणुकीत कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले नाही परंतु ती सर्वांत मोठे दल म्हणून पुढे आली. कॉंग्रेसने २३२ जागांवर विजय मिळवले होते. मग नरसिंह राव यांना कॉंग्रेस संसदीय दलाचे नेतृत्व बहाल करण्यात आले. अशात त्यांनी सरकार बनवण्याचा दावा केला. सरकार अल्पमतात होते, परंतु कॉंग्रेसने बहुमत सिद्ध करण्याइतके खासदार जमवले आणि कॉंग्रेस सरकारने ५ वर्षांचा आपला कार्यकाल यशस्वीरीत्या उपभोगला.