अटल बिहारी वाजपेयी
अटल बिहारी वाजपेयी भारताचे माजी पंतप्रधान आहेत. ते आधी १६ मे ते १ जून १९९६ आणि पुन्हा मार्च १९९८ पासून २२ मे २००४ पर्यंत भारताचे पंतप्रधान राहिले. ते हिंदी कवी, पत्रकार आणि प्रखर वक्ता आहेत. भारतीय जनसंघाची स्थापना करणाऱ्या महान पुरुषांपैकी ते एक आहेत आणि १९६८ पासून १९७३ पर्यंत ते त्याचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. ते आयुष्यभर भारतीय राजकारणात सक्रीय राहिले. त्यांनी दीर्घ काळापर्यंत राष्ट्रधर्म, पांचजन्य आणि वीर अर्जुन इत्यादी राष्ट्रीय भावनेने ओतप्रोत असलेल्या पत्रकांचे संपादन देखील केले. त्यांनी आपले जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकाच्या रूपात आजीवन अविवाहित राहण्याचा संकल्प करून आरंभ केले होते आणि देशाच्या सर्वोच्च पदावर पोचेपर्यंत त्या संकल्पाला संपूर्ण निष्ठेने निभावले. वाजपेयी राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन (राजग) सरकारचे पहिले पंतप्रधान होते ज्यांनी बिना कॉंग्रेस पंतप्रधान पदाची ५ वर्षे कोणत्याही समस्येविना पूर्ण केली. त्यांनी २४ दलांच्या एकत्रीकरणाने सरकार बनवले होते ज्यामध्ये ८१ मंत्री होते. कधीही कोणत्याही दलांनी कोणतीही गडबड केली नाही. यावरून त्यांच्या नेतृत्व क्षमतेचा अंदाज करता येतो.
वाजपेयी सरकारने ११ आणि १३ मे १९९८ ला पोखरण मध्ये ५ भूमिगत आण्विक चाचणी विस्फोट करून भारताला अणुशक्ती संपन्न देश घोषित केले. या गोष्टीमुळे त्यांनी भारताला निर्विवादपणे जगाच्या नकाशावर एक सुदृढ वैश्विक शक्ती या रुपात सादर केले. काही काळानंतरच पाकिस्तानने तत्कालीन सेना प्रमुख परवेज मुशर्रफ च्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी यांना कारगिल क्षेत्रात घुसवून अनेक पर्वत शिखरांवर कब्जा केला. वाजपेयी सरकारने पाकिस्तान सीमेचे उल्लंघन न करण्याच्या आंतरराष्ट्रीय सल्ल्याचा मान राखत धैर्यापूर्वक आणि ठोस कारवाई करून भारतीय क्षेत्र मुक्त केले. या युद्धात प्रतिकूल परिस्थितीमुळे भारतीय सेनेला मोठ्या वित्तहानी आणि जीवित हानीला सामोरे जावे लागले.