Get it on Google Play
Download on the App Store

चौधरी चरण सिंह

http://images.jagran.com/images/29_05_2013-CharanSingh29.jpg

चौधरी चरण सिंह भारताचे सातवे पंतप्रधान होते. त्यांनी २८ जुलै १९७९ ते १४ जानेवारी १९८० पर्यंत पंतप्रधानपद सांभाळले. चौधरी चरण सिंहानी आपले संपूर्ण जीवन भारतीयता आणि ग्रामीण परीवेशाच्या मर्यादेत व्यतीत केले.
त्यांचा जन्म एका जाट परिवारात झाला. स्वातंत्र्याच्या वेळी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ते राम मनोहर लोहिया यांच्या ग्रामीण सुधार आंदोलनात सहभागी झाले.
त्यांना शेतकऱ्यांचा नेता मानले जाते. त्यांनी तयार केलेले जमीनदारी उच्चाटन विधेयक राज्याच्या कल्याणकारी सिद्धांतावर आधारित होते. १ जुलै १९५२ ला उत्तर प्रदेश मध्ये त्यांच्यामुळे जमीनदारी प्रथा बंद झाली आणि गरिबांना त्यांचे अधिकार मिळाले. त्यांनी लेखापाल हे पद निर्माण केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी १९५४ मध्ये उत्तर प्रदेशात जमीन संरक्षण कायदा संमत केला. ३ एप्रिल १९६७ ला ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. १७ एप्रिल १९६८ ला त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.