जवाहरलाल नेहरू
जवाहरलाल नेहरूंचा जन्म उत्तर प्रदेशच्या इलाहाबाद मध्ये झाला होता. ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते.
सन १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर जेव्हा भावी पंतप्रधान पदासाठी कॉंग्रेसमध्ये मतदान झाले होते तेव्हा सरदार पटेलांना सर्वाधिक मते मिळाली होती. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर होते आचार्य कृपलानी. परंतु गांधीजींच्या सांगण्यावरून सरदार पटेल आणि आचार्य कृपलानी यांनी आपली नावे मागे घेतली आणि जवाहरलाल नेहरूंना पंतप्रधान बनवण्यात आले.
खूप लोकांचे म्हणणे होते की नेहरूंनी अन्य नेत्यांच्या तुलनेत भारताच्या स्वतंत्रता संग्रामात फारच कमी योगदान दिले होते. तरी देखील गांधींनी त्यांना भारताचे पंतप्रधान बनवले. स्वातंत्र्यानंतर अनेक दशके भारतीय लोकशाहीमध्ये सत्तेच्या सूत्रधारांनी वेगवेगळ्या पद्धतीने देशात राजतंत्र चालवले. विचारधारेच्या जागी व्यक्ती पूजेला प्रतिष्ठित केले आणि तथाकथित लोकप्रियतेच्या भांडवलाच्या कोशात गुरफटून राहून लोकहिताची पूर्णपणे उपेक्षा केली. एप्रिल २०१५ मध्ये असा देखील खुलासा झाला की स्वातंत्र्यानंतर नेहरूंनी वीस वर्षे आय.बी. द्वारे नेताजींच्या संबंधियांची हेरगिरी केली.