विश्वनाथ प्रताप सिंह
विश्वनाथ प्रताप सिंह भारताचे आठवे पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांचे शासन एक वर्षाहूनही कमी काळ चालले, २ डिसेंबर १९८९ ते १० नोव्हेंबर १९९० पर्यंत. राजीव गांधी सरकार बरखास्त झाल्यामुळे पंतप्रधान बनलेल्या विश्वनाथ प्रताप सिंह यांनी निवडणुकीच्या माध्यमातून २ डिसेंबर १९८९ रोजी हे पद प्राप्त केले होते. श्री व्ही पी सिंह अतिशय इमानदार होते आणि दलित, मागासवर्गीय आणि वंचित समुदायांबद्दल त्यांच्या मनात अतिशय कणव होती.
व्यक्तिगत जीवनात विश्वनाथ प्रताप सिंह अत्यंत निर्मळ स्वभावाचे होते आणि प्रधानमंत्री म्हणून त्यांची छबी एक मजबूत आणि सामाजिक राजनैतिक दूरदर्शी व्यक्तीची होती. त्यांनी मंडल आयोगाच्या शिफारसी मान्य करून देशात वंचित समुदायाच्या सत्तेतील अधिकारावर शिक्कामोर्तब केले.
२७ नोव्हेंबर २००८ रोजी दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटल मध्ये वयाच्या ७७ व्या वर्षी व्ही पी सिंह यांचा मृत्यू झाला.