Android app on Google Play

 

भूमिका

 

महान फ्रेंच भविष्यकार नॉस्त्रेदमस चा जन्म १४ डिसेंबर १५०३ रोजी फ्रांसचे एक छोटे गाव सेंट रेमी मध्ये झाला होता. त्यांनी आपले सुप्रसिद्ध पुस्तक ‘द प्रोफेसीज’ मध्ये जवळपास ९५० भविष्यवाणींचा उल्लेख केला आहे. त्यांच्या बहुतेक भविष्यवाणी त्यांनी लिहिलेल्या कविता आणि सांकेतिक भाषेत छापलेल्या होत्या. त्यांची अनेक भविष्य तंतोतंत खरी ठरली आहेत. आज आपण त्यांच्या अशाच १० भविष्यवाण्या पाहणार आहोत.

परंतु त्याआधी आपण त्यांच्या जीवनातील २ घटना पाहणार आहोत. त्यांनी आपल्या तरुण वयापासूनच भविष्यवाणी करण्यास सुरुवात केली होती. एक घटना तर अशी होती की त्यामुळे संपूर्ण युरोप मध्ये खळबळ माजली होती. एक दिवस ते आपल्या मित्राबरोबर इटलीच्या रस्त्यांवर फिरत होते. तेवढ्यात त्यांनी गर्दीत एका तरुणाला पहिले. जेव्हा तो तरुण त्यांच्या जवळ आला तेव्हा त्यांनी मस्तक झुकवून त्याला अभिवादन केले. मित्राने आश्चर्याने त्यांना याचे कारण विचारले तेव्हा ते म्हणाले की हा तरुण पुढे पोपचे आसन ग्रहण करणार आहे. तो तरुण म्हणजेच फेलिस पेरेसी, जे १५८५ मध्ये पोप म्हणून निवडले गेले.

१५५० मध्ये नॉस्त्रेदमसने स्वतःचे पंचांग काढायला सुरुवात केली होती, ज्यामध्ये ग्रहांची स्थिती, ऋतू आणि शेतीच्या बाबतीत पूर्वानुमान लिहिलेले असायचे. त्यांच्यापैकी बहुतेक सर्व सत्य ठरत असत. त्यांना आपल्या मृत्यूबद्दल देखील समजले होते. एवढेच नाव्हे तर त्यांनी हे देखील सांगितले होते की त्यांच्या मृत्युनंतर २२५ वर्षांनंतर काही समाज विरोधी तत्वाचे लोक त्यांची कबर खोदून अवशेष बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील, परंतु ताबडतोब त्यांचा मृत्यू होईल. आणि प्रत्यक्षात अगदी तसेच घडले. फ्रान्सीसी क्रांतीच्या नंतर १७९१ मध्ये तीन लोकांनी त्यांची कबर खोदण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथेच त्या तिघांचा मृत्यू झाला.