वेद मंत्रांचे संकलन आणि वेदांची संख्या
असे मानले जाते की सुरुवातीला वेद एकाच होता, आणि त्याचे अध्ययन सोयीचे व्हावे म्हणून नंतर त्याला ४ भागांत विभागित करण्यात आले. हे श्रीमद् भगवत गीतेत उल्लेख असलेल्या एका श्लोकातूनच स्पष्ट होते. या वेदांमध्ये हजार मंत्र आणि रचना आहेत्त ज्या एकाच वेळी रचलेल्या असणे असंभव वाटते तसेच एकाच ऋषीने देखील रचणे असंभव वाटते. त्यांची रचना वेळोवेळी ऋषिंद्वारे होत राहिली आणि ते नंतर एकत्रित होत गेले.
शतपथ ब्राम्हणाच्या श्लोकानुसार अग्नि, वायु आणि सूर्याने तपश्चर्या केली आणि ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद प्राप्त केले. प्रथम तीन वेदांना अग्नी, वायू आणि सूर्याशी जोडण्यात आले आहे. या तीनही नावांच्या ऋषींशी त्यांचा संबंध सांगण्यात आला आहे, कारण याचे कारण असे आहे की अग्नी त्या अंधाराला समाप्त करतो जो अज्ञानाचा अंधार आहे. या कारणाने तो ज्ञानाचे प्रतिक बनला आहे. वायू स्वतः जंगम (movable) आहे, त्याचे काम सतत वाहणे हेच आहे. याचे तात्पर्य आहे की कर्म अथवा कार्य करीत राहणे. त्यामुळे तो कर्माशी संबंधित आहे. सूर्य हा सर्वांत तेजस्वी आहे, ज्याला सर्व प्रणाम करतात, नतमस्तक होऊन त्याचे पूजन करतात. म्हणूनच म्हटलेले आहे की तो पूजनीय अर्थात उपासनेला योग्य आहे. एका ग्रंथानुसार ब्रम्हदेवाच्या ४ मुखांतून ४ वेदांची उत्पत्ती झाली.