वेद
हे जग, हे जीवन तसेच परमपिता परमेश्वर; या सर्वांचे वास्तविक ज्ञान "वेद" आहे. वेद भारतीय संस्कृतीचे असे ग्रंथ आहेत ज्यामध्ये ज्योतिष, गणित, विज्ञान, धर्म, औषधे, सृष्टी, खगोल शास्त्र इत्यादी जवळ जवळ सर्व विषयांवरील ज्ञानाचे भांडार भरलेले आहे. वेद हा आपल्या भारतीय संस्कृतीचा कणा आहे. त्यांच्यामध्ये अनिष्टावर उपाय तसेच एखादी इच्छा असेल तर तिला प्राप्त करण्याचे उपाय दिलेले आहेत. परंतु ज्याप्रमाणे कोणत्याही कार्यात मेहेनत लागते, त्याप्रमाणेच या रत्न रुपी वेदांचे श्रमपूर्वक अध्ययन करूनच त्यांच्यामध्ये समाविष्ट असलेले ज्ञान मनुष्य प्राप्त करून घेऊ शकतो.