Get it on Google Play
Download on the App Store

परशुराम



परशुराम हा भगवान शंकराचा भक्त होता आणि त्याने एकदा स्वयं शंकराशी युद्ध केले होते. २१ दिवसांच्या ह्या लाढाईमध्ये परशुरामाने शंकराला त्याच्या परशूने मारले.  तो परशू शंकराच्या डोक्याला लागून शंकराच्या माथ्याला जखम झाली. भगवान शंकर त्यांच्या भक्तावर अतिप्रसन्न झाले आणि त्यांनी ती जखम जपून ठेवली. श्री परशुरामाने आपल्या परशूने सहस्त्रअर्जुनाच्या सहस्त्र भुजा कापल्या आणि त्याचा वध केला. भगवान इंद्राकडे जे शिव-विजय धनुष्य होते, ते त्याने परशुरामाला दिले. ह्या धनुष्याच्या मदतीने परशुरामाने २१ वेळा जगातील क्षत्रियांचा नाश केला. पुढे परशुरामाने हे धनुष्य कर्णाच्या  समर्पणाला प्रसन्न होऊन कर्णाच्या स्वाधीन केले. महाभारताच्या १७व्या दिवशीच्या युद्धात कर्णाने ह्याच धनुष्याचा वापर केला.