विदुर
विदुर हा राजा धृतराष्ट्र आणि पांडू यांचा सावत्र भाऊ असल्याचे मानले जाते. राजा विचीत्रावीर ह्याच्या मृत्यूनंतर सत्यवतीने आपल्या दोन्ही सूना अंबिका आणि अंबालिका ह्यांना पुत्रप्राप्तीसाठी आपला पुत्र वेद व्यास ह्याच्याकडे पाठवले. व्यासमुनींचे भयानक रूप बघून अम्बिकेनी डोळे बंद केले आणि अंबालिका अशक्त झाली. व्यासानी सांगितले अंबिकेचा पुत्र अंध होईल आणि अंबालिकेचा पुत्र अशक्त होईल. व्यासांनी पुन्हा अंबिकेला पुत्र देण्याची अनुमती दिली. ह्यावेळी तिने स्वतःऐवजी आपल्या दासीला पाठवले जी घाबरलेली नव्हती. दासीने सशक्त मुलाला जन्म दिला, त्याचे नाव विदुर. विदुर हा धर्म राजाचा अवतार होता. त्याचे ज्ञान विदुर नीति म्हणून संबोधले जाते.
तो राजकुलातील नसल्याकारणाने सल्लाकार म्हणून नियुक्त करण्यात आला. लक्षगृहाविषयी सांगून पांडवांचे प्राण वाचवण्यात विदुराने मोठी मदत केली. द्रौपदीच्या अपमानाविरुद्ध कौरवांच्या राजसभेत आवाज उठवणारा विदुर हा एकमेव व्यक्ती होता. विदुराच्या एकनिष्ठ स्वभावामुळे आणि सर्व क्षेत्रांतील नैपुण्यामुळे कृष्ण विदुराचा आदर करत असे. तरीसुद्धा केवळ राजकुलातील न असल्या कारणाने विदुराला महाभारतात त्याच्या योग्यतेप्रमाणे महत्व मिळाले नाही.