कृतवर्म
कृतवर्म हा अतिशय साहसी यादव कृष्णाबरोबरच्या काळातील योद्धा होता. कृष्णभक्त असूनसुद्धा त्याचे कृष्णाबरोबरचे संबंध खूप चांगले नव्हते. कृष्णाचा सासरा सत्रजित ह्याच्या वधाचा कट रचणाऱ्या काही लोकांपैकी तो एक होता. कृतवर्म हा कौरवांचा मित्र होता आणि त्याने नारायणी सेनेचे नेतृत्व केले. कौरवांतर्फे युद्धात जिवंत राहिलेल्या तीन व्यक्तींपैकी तो एक होता. युद्धाच्या १८व्या दिवशी, त्याने पंचाल आणि द्रौपदीच्या मुलांची हत्या करण्यात अश्वत्थामाची मदत केली. युद्धानंतर तो आपल्या राज्यात परतला पण अंतिम यादवी संघर्षात सात्यकीने त्याचा वध केला.
द्रुपदाने राजा हिरण्यवर्मन याच्या मुलीशी शिखंडीनीचा विवाह लाऊन दिला. गुपित उघडकीस आल्यावर मात्र हिरण्यवर्मनाने द्रुपदाविरुद्ध युद्ध पुकारले. द्रुपदाला ह्याची खात्री होती की त्याचा पराभव निश्चित आहे आणि शिखंडीनी जंगलात पळून गेली. जंगलात यक्षाच्या महालात तिने कठोर प्रायश्चित केले.
इतकी सुंदर स्त्री असूनसुद्धा ती इतके कठीण प्रायश्चित का करीत आहे असा प्रश्न यक्षाने विचारल्यावर शिखंडीनीने आपली सर्व कथा सांगितली आणि आपल्याला पुरुष बनवावे अशी याक्षाकडे मागणी केली. यक्षाने आपल्या लिंगाची तिच्याशी आदलाबदल केली आणि तिचा शिखंडी झाला. आता तो पुरुष झाल्याने हिरण्यवर्मन ह्या सर्व अफवा आहेत असे समजून युद्ध मागे घेतो. नंतर शिखंडीला क्षत्रधर नावाचा एक मुलगा होतो, जो युद्धात मृत्यूमुखी पडला. शिखंडी उपेक्षित राहिला कारण तो एकमेव असा व्यक्ती होता ज्याला युद्धात कुणीही पराभूत करू शकलं नाही. असे मानले जाते की जेव्हा अश्वत्थामानी पांडवांच्या ताफ्यावर आक्रमण करून पांडवांच्या मुलांचे प्राण घेतले, तेव्हा शिखंडी युद्धाच्या १८व्या रात्री मेला.