शिखंडी
शिखंडी म्हणजे गतजन्मीची अंबा. शिखंडीला भगवान शंकराचं वरदान होतं की एक दिवस तो भीष्माचा वध करेल. परंतु त्यासाठी अंबेचे पुरुष असणे आवश्यक होते. म्हणून अंबा पुढच्या जन्मात पुरुष म्हणून जन्माला आली. त्याचवेळी द्रुपदानी भीष्मवधासाठी मुलगा मिळावा म्हणून शंकराची प्रार्थना केली. म्हणून शंकरांनी द्रुपदाला असा विचित्र वर दिला की द्रुपदाचे अपत्य पहिले मुलगी असेल आणि नंतर एक पुरुष जो भीष्माचा वध करेल.
द्रुपदाने या वरचा स्वीकार केल्यावर लवकरच शिखंडीचा जन्म होतो. दुपादाला हे माहिती होतं की ती लवकरच एक मुलगा होईल. म्हणून त्याने आपल्या मुलीचे संगोपन एका मुलासारखे केले. दुर्दैवाने लग्नास योग्य वयाची झाली असताना देखील ती मुलगीच होती पण नाइलाजाने तो मुलगा असल्याचे सगळ्यांना सांगितल्या कारणाने द्रुपदाला तिचे लग्न दुसऱ्या स्त्री बरोबर करून द्यावे लागले.