युयूत्सू
धृतराष्ट्राला एका सुगंधा नावाच्या वैश्य स्त्रीकडून एक मुलगा होता. तो आणि दुर्योधन समवयस्क होते आणि युद्धात शेवटपर्यंत जिवंत राहिलेला तो एकमेव कौरव होता. युयूत्सूने पांडवांतर्फे युद्ध केले. त्याकाळी युयूत्सू हा नैतिक आणि सदाचरणी असा योद्धा मानला जायचा. दुराचरणी लोकांमध्ये वाढ होऊनसुद्धा त्यानी सदाचाराचा मार्ग सोडला नाही. कौरवांच्या महत्वाच्या युद्धयोजनांची माहिती देऊन त्यानी पांडवांची मदत केली. युध्द समाप्त झाल्यावर तो इंद्रपस्थचा राजा झाला.