Android app on Google Play

 

“होइया बसिऊ

 

http://cluj.wpengine.netdna-cdn.com/assets/hoia-baciu-project-vineri.jpg

रोमानियाच्या ट्रांसिलवेनिया जिल्ह्यात “होइया बसिऊ” (Hoia Baciu) नावाचे एक रहस्यमय जंगल आहे. हे जंगल खूपशा रहस्यमय गोष्टी आणि भुताटकीच्या प्रकारांसाठी बदनाम आहे. या जंगलात फिरायला गेलेले पर्यटक जेव्हा जंगल फिरून परत येतात तेव्हा त्यांच्या शरीरावर भाजल्याच्या आणि ओरखडे आल्याच्या खुणा असतात. परंतु त्यांच्यापैकी कोणाला हे माहिती नसतं की हे कधी आणि कसं झालं. तसेच काही लोक असा देखील दावा करतात की जंगल यात्रेतील काही तास त्यांना आठवतच नाहीत. या काही तासांच्या अवधीत काय झाले यापैकी त्यांना काहीच आठवत नाही. ते याला 'हरवलेला काळ' म्हणतात. या क्षेत्रातील बहुतेक लोकांचा विश्वास आहे की या जंगलात काहीतरी भूताटकीचे प्रकार होतात. परंतु कारण काहीही असेल, या घटना म्हणजे आजपर्यंत एक रहस्यच बनून राहिले आहे.