गरुण पुराणाच संदेश
प्रत्यक्षात गरुड पुराणाच्या समस्त कथा आणि उपदेशांचे सार हे आहे की आपण आसक्तीचा त्याग करून वैराग्यासाठी प्रवृत्त झाले पाहिजे तसेच संसारिक बंधनांतून मुक्त होण्यासाठी एकमात्र परमात्म्याला शरण गेले पाहिजे. ही लक्ष्यप्राप्ति कर्मयोग, ज्ञान अथवा भक्ति द्वारे कशा प्रकारे होऊ शकते याची व्याख्या या ग्रंथात विषद केलेली आहे.
मनुष्य या लोकात गेल्यावर आपल्या पारलौकिक जीवनाला कशा प्रकारे सुख समृद्ध आणि शान्तिप्रद बनवू शकतो तसेच मृत्युनंतर त्याच्या उद्धारासाठी पुत्र पौत्रादी परिवारातील जणांचे काय कर्तव्य आहे याचे देखील विस्तृत वर्णन या ग्रंथात आहे. या गरुड पुराणाच्या श्रवण आणि पठणाने स्वाभाविक पुण्यलाभ होतो आणि मनुष्याला अगाध असे ज्ञान संपादन होते.