नरक वर्णन
गरुड पुराणाच्या दुसर्या अध्यायात हे वर्णन मिळते. त्याच्या नुसार - गरुडाने सांगितले आहे - हे केशव! यामालोकाचा मार्ग कशा प्रकारे दुःखदायी असतो, पापी लोक तिथे कशा प्रकारे जातात ते कृपया मला सांगा. भगवंत म्हणाले - हे गरुड! महान असे दुःख देणाऱ्या यममार्गाच्या विषयी मी तुला सांगतो. माझा भक्त असून देखील तुझा ते सर्व ऐकून थरकाप उडेल.
यममार्गात वृक्षाची छाया नाहीये, अन्न देखील नाही, तिथे पाणी देखील नाही, तिथे प्रलय काळाप्रमाणे १२ सूर्य तळपत राहतात. त्या मार्गावरून जाणारा पापी कधी बर्फाळ हवेव्मुळे त्रस्त होती तर कधी त्याला काटे घायाळ करतात. कधी भयंकर विषारी सर्प त्याला डसतात तर कुठे त्याला अग्नीने जाळण्यात येते. कुठ्ये त्याला वाघ, सिंह, आणि भयंकर कुत्रे लचके तुडून खून टाकतात, कधी त्याला विंचू चावतात.
त्यानंतर गरुड त्या भयानक 'असिपत्रवन' नावाच्या नरकात जातो, जो दोन हजार योजने विस्ताराचा आहे. ते वन कावळे, घुबड, गिधाडे, डास यांनी भरलेले आहे. तिथे चहू बाजूंना दावाग्नी आहे. तो जीव कित्येक अंध विहिरींमध्ये पडतो, कित्येक पर्वतांवरून पडतो, कुठे सुरीच्या धारेवरून चालतो, कुठे खिळ्यांच्या वावरून चालतो, कुठे गडद अंधारात पडतो, कुठे उकळत्या पाण्यात पडतो, तर कुठे जळवांनी भरलेल्या चिखलात पडतो. कुठे तप्त वाळूने व्यापलेले आणि धगधगते ताम्रमय मार्ग, कुठे निखाऱ्यांच्या राशी, कुठे अतिशय धुराने भरलेले मार्ग यांच्यातून त्याला चालावे लागते. कुठे अग्नी वृष्टी, कुठे वीज पडते, दगडांचा पाऊस, कुठे रक्ताची वृष्टी, कुठे शस्त्रांची तर कुठे तप्त पाण्याची वृष्टी होते. कुठे खाऱ्या चिखलाची वृष्टी होते. कुठे पू, रक्त आणि विष्ठेने भरलेले तलाव आहेत. यम मार्गाच्या मधोमध अत्यंत उग्र आणि घोर अशी वैतरणी नदी वाहते. ती पाहायला अतिशय दुःखकारक आहे.
तिचा आवाज भीतीदायक आहे. ती शंभर योजने रुंद आणि पीब व रक्ताने भरलेली आहे. हाडांच्या गठ्ठ्याने तिचे किनारे बनलेले आहेत. तिच्यामध्ये विशाल मगरी आहेत. हे गरुडा! आलेल्या पापी माणसाला बघून ती नदी ज्वाला आणि धूर यांनी भरलेली कढई त उकळणाऱ्या तुपासारखी बनते. ही नदी सुईच्या सारखे तोंड असलेल्या भयानक किड्यांनी भरलेली आहे. वाज्रासामान चोच असलेली मोठमोठी गिधाडे आहेत. या प्रवाहात पडलेले पापी आपला भाऊ, काका, वडील, मुलगा यांच्या नावाने आक्रोश करतात.
प्रचंड प्रमाणात विंचू आणि काळ्या सापांनी भरलेल्या या नदीत त्याचे रक्षण करायला कोणीही नसते. या नदीच्या शेकडो हजारो भोवऱ्यात सापडून पापी पाताळात निघून जातो आणि क्षणभरात वर येतो. काही पापी पाशात बांधले गेलेले असतात. काही अन्कुशात अडकून ओढले जातात. ते पापी हात, पाय आणि मान साखळ्यांनी बांधलेल्या अवस्थेत असतात. त्यांच्या पाठीवर लोखंडाचे वजन असते. अतिशय घोर अशा यामादुतांकडून चाबकानी मार खाताना ते रक्त ओकत असतात आणि ओकलेले रक्त पुन्हा प्राशन करत असतात. अशा प्रकारे सतरा दिवस वायुवेगाने चालत अठराव्या दिवशी ते प्रेत सौम्यपुरात जाते. एक गोष्ट नक्की की गरुड पुराणातील हे वर्णन म्हणजे मनुष्याला धर्माचे आचरण करण्यासाठी आणि पापांपासून दूर राहण्यासाठीच रचण्यात आलेले आहे.