Android app on Google Play

 

स्वर्ग - नरक

 

स्वर्ग-नरक

हिंदू धर्म शास्त्रात वरील ३ प्रकारच्या अवस्थांचे विस्तृत स्वरुपात विवेचन केलेले आहे. ज्या प्रकारे ८४ लक्ष योनी आहेत, त्याच प्रकारे ८४ लक्ष नरक देखील आहेत, ज्यांना मनुष्य आपल्या कर्म फळाच्या रुपात भोगतो. गरुड पुराणाने हीच स्वर्ग - नरक वाली व्यवस्था निवडून तिचे विस्ताराने वर्णन केलेले आहे. याच कारणाने भयभीत मनुष्य अधिक दान धर्म पुण्य करण्याकडे प्रवृत्त होतो.
प्रेत कल्पात म्हटले आहे की नरकात गेल्यानंतर प्राणी प्रेत बनून आपले परिजन आणि संबंधी यांना अनेक कष्ट देऊन पिडत राहतो. तो परस्त्री आणि परधन यांच्यावर नजर ठेवणाऱ्या व्यक्तींना देखील खूप त्रास देतो.
जी व्यक्ती दुसऱ्यांची संपत्ती बळकावते, मित्राशी द्रोह करते, विश्वासघात करते, ब्राम्हण किंवा मंदिराची संपत्ती हडप करते, स्त्रिया आणि मुले यांचे संग्रह केलेले धन हिसकावून घेते, परक्या स्त्रीशी व्यभिचार करते, दुर्बलांना त्रास देते, ईश्वरावर विश्वास ठेवत नाही, मुलींना विकते; आई, बहीण, कन्या, पुत्र, स्त्री, पुत्रवधु हे निर्दोष असून देखील त्यांचा त्याग करते, अशी व्यक्ती प्रेत योनीत अवश्य जाते.
त्याला अनेकानेक नरक यातना भोगाव्या लागतात. त्याला कधीच मुक्ती मिळत नाही. अशा व्यक्तीला जीवन्तापानीच अनेक रोग आणि व्याधी जडतात. व्यापारात नुकसान, गर्भनाश, गृह कलह, ज्वर, शेतीत नुकसान, संतान मृत्यू इत्यादींमुळे तो सतत दुःखी होत राहतो. अकाली मृत्यू त्याच व्यक्तीला येतो जो धर्माचे आचरण आणि नियमांचे पालन करत नाही आणि ज्याचे आचार विचार दुषित असतात. त्याची दुष्कर्म त्याला अकाली मृत्यूत ढकलून देतात.
गरुड पुराणात प्रेत योनी आणि नरकात जाण्यापासून वाचण्याचे उपाय देखील सुचवलेले आहेत. त्यांच्यामध्ये सर्वांत प्रमुख उपाय दान - दक्षिणा, पिंडदान तसेच श्राद्ध कर्म इत्यादी सांगण्यात आलेले आहेत.
सर्वाधिक प्रसिद्ध प्रेतकल्प च्या व्यतिरिक्त या पुराणात आत्मज्ञानाचे महत्व देखील प्रतिपादित केलेले आहे. परमात्म्याचे ध्यान हाच आत्मज्ञानाचा सर्वात साधा आणि सरळ उपाय आहे. त्यासाठी आपले मन आणि इंद्रियांवर संयम ठेवणे अतिशय आवश्यक आहे. अशा प्रकारे कर्मकांडावर सर्वाधिक भर दिल्यानंतर गरुड पुराणात ज्ञानी आणि सत्यव्रत व्यक्तीला विना कार्माकांदाने सद्गती प्राप्त करून उच्च लोकांत स्थान प्राप्त करून घेण्यासाठी देखील विधी सांगण्यात आलेला आहे.