आत्म्यांचे सूक्ष्म विवेचन
या पृथ्वीवर ४ प्रकारचे आत्मे पाहायला मिळतात. काही व्यक्ती अशा असतात की चांगले आणि वाईट यांच्या भावापासून अलिप्त असतात. अशा आत्म्यांना पुन्हा जन्म घेण्याची आवश्यकता नसते. ते या जन्म आणि मृत्युच्या बंधनातून मुक्त होऊन जातात. यांना खरे संत आणि महात्मा म्हणतात. चांगले आणि वाईट त्यांच्यासाठी महत्वाचे नसतात. त्यांना सर्व सारखे असते. ते सर्वांवर प्रेम करतात, आणि कोणाचीही त्यांना घृणा वाटत नाही.
त्याचप्रमाणे काही व्यक्ती अशा असतात की जे चांगले आणि वाईट यांच्या प्रती समतुल्य असतात म्हणजेच दोन्हीला समान भावाने पाहतात. हे देखील या जन्म आणि मृत्युच्या फेऱ्यातून मुक्त होऊन जातात. परंतु तिसर्या प्रकारचे लोक असे असतात की जे साधारण असतात. त्यांच्यात चांगलेल गुण असतात तसेच वाईट देखील असतात. त्यांचे व्यक्तिमत्व म्हणजे चांगले आणि वाईट यांचे एक मिश्रण असते. असे साधारण प्रकारचे लोक मृत्यू झाल्यानंतर तत्काळ कोणत्या ना कोणत्या गर्भाला प्राप्त होतात. कोणते ना कोणते तरी शरीर प्राप्त करतात.