विष्णु भक्ती
प्रत्यक्षात सत्य हे आहे की गरुड पुराणात भगवान विष्णूंच्या भक्तीचे विस्तृत स्वरुपात वर्णन मिळते. विष्णूच्या २४ अवतारांचे वर्णन ज्याप्रमाणे श्रीमद् भागवत गीतेमध्ये मिळते, त्याच प्रमाणे गरुड पुराणात देखील मिळते. आरंभी मनु पासून सृष्टीची उत्पत्ती, ध्रुव चरित्र आणि बारा आदित्यांची कथा प्राप्त होते. त्यानंतर सूर्य आणि चंद्र ग्रहांचे मंत्र, शिवा पार्वती मंत्र, इंद्राशी संबंधित मंत्र, सरस्वतीचे मंत्र आणि ९ शक्तींच्या विषयी विस्तृत स्वरूपाने सांगण्यात आले आहे.