Android app on Google Play

 

सार तत्त्व

 

 कथा

या पुराणात नीती संबंधी सार तत्व, आयुर्वेद, गया तीर्थाचे महात्म्य, श्राद्ध विधी, दशावतार चरित्र, सूर्य - चंद्र वंशाचे वर्णन, इत्यादी विस्तृत स्वरुपात प्राप्त होते. मध्ये मध्ये काही अन्य वंशांचा देखील उल्लेख आहे. या व्यतिरिक्त गारुडी विद्या मंत्र पक्षी ॐ स्वाहा आणि विष्णू पंजर स्तोत्र इत्यादींचे वर्णन देखील मिळते. गरुड पुराणात विविध रत्ने आणि मण्यांच्या लक्षणांचे वर्णन विस्तारपूर्वक करण्यात आले आहे.
त्यासोबतच ज्योतिष शास्त्र, सामुदिक शास्त्र, सापांची लक्षणे, धर्म शास्त्र, विनायक शांती, वर्णाश्रम धर्म व्यवस्था, विधी - व्रत - उपास, संपूर्ण अष्टांग योग, पतीव्ररतात धर्म महात्म्य, जप - तप - कीर्तन आणि पूजा विधी इत्यादींचे सविस्तर वर्णन आहे. या पुराणाच्या प्रेत कल्पात पस्तीस अध्याय आहेत, जे सनातन हिंदू धर्मात सर्वांत अधिक प्रचलित आहेत.
या पस्तीस अध्यायांत यमलोक, प्रेतलोक आणि प्रेत योनी का प्राप्त होते, त्याची करणे, दान महिमा, प्रेत योनिपासून वाचण्याचे उपाय, अनुष्ठान आणि श्राद्ध कर्म इत्यादींचे सविस्तर वर्णन करण्यात आलेले आहे. या सर्व गोष्टी मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांवर प्रचंड प्रभाव पाडतात. ते दिवंगत व्यक्तीच्या मुक्तीसाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी पुराणानुसार भरपूर दान आणि दक्षिणा देण्यासाठी तत्पर होतात. या पुराणाचे उद्दिष्ट देखील हेच आहे.