Android app on Google Play

 

गुलाब बाग उदयपुर

 


गुलाब बागेला सज्जन निवास या नावानेही ओळखले जाते. हे उदयपूरचे सर्वात सुंदर आणि मोठे गार्डन आहे. याला महाराणा सज्जन सिंह यांनी १०० एकरच्या भूभागात बनवलं आहे. येथे राजस्थान मधील सर्वात मोठे गुलाबांचे गार्डन आहे. गुलाबांच्या फुलांमुळे या गार्डनचे नाव गुलाब गार्डन ठेवण्यात आले. हे गार्डन पिछोला नावाच्या लेकच्या डाव्या बाजूला आहे. या गार्डनमध्ये तुम्हाला गुलाबांचे अनेक प्रकार पहायला मिळतील जे तुम्ही दुसरीकडे कुठेच पाहिले नसतील. या गार्डनचे नाव जगातल्या सर्वात सुंदर गार्डनच्या नावांच्या यादीत घेतल जाते. जर तुम्हाला नैसर्गिक सुंदरता पसंत असेल तर तुम्ही गुलाब गार्डनला नक्की जा. या गार्डनमध्ये सरस्वती भवन नावाची एक पब्लिक लायब्ररी सुद्धा आहे. या गार्डनमध्ये फिरण्यासोबत तुम्ही छोट्या ट्रेन मध्येही बसू शकता आणि जनावरांनाही पाहू शकता.