Android app on Google Play

 

पिंजौर गार्डन, चंडीगड

 


जर तुम्ही चंडीगडला जाणार असाल तर तिथे तुम्हाला पिंजौर गार्डन फिरायला खूप आवडेल. या गार्डनला स्थानिक लोक याद्विन्द्र गार्डन या नावाने ओळखतात. पिंजौर गार्डनमध्ये तुम्हाला पुरातनकाळातील अनेक महत्वाच्या गोष्टी पाहायला मिळतील. पौराणिक कथेनुसार अज्ञातवासात असताना पांडव या उद्यानात फिरायला यायचे. शहरातला हा फेमस पिकनिक स्पॉट आहे, सोबतच इथे जपानी गार्डन सुद्धा बघण्यासारख आहे. या गार्डनमध्ये एक प्राणीसंग्रहालय आणि एक नर्सरी आहे. पिंजौर गार्डनला रात्रीच्यावेळी रंगीत लाइटींगने सजवलं जात. येथे कारंजेही आहेत. टुरिस्ट येथे रात्रीच्यावेळी फिरायला येण पसंत करतात. या गार्डनमध्ये फिरायला येण्याचा योग्य कालावधी एप्रिल पासून जून पर्यंत आहे, कारण यावेळी इथे बैसाखीचा सण साजरा केला जातो. याव्यतिरिक्त येथे मैंगो फेस्टिवलही खूप फेमस आहे.