बिरसा मुंडा
त्यांच्या राणीचे साम्राज्य उखडून टाका आणि आपले साम्राज्य स्थापन करा ही हाक आजही ओडीसा, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहार च्या आदिवासी क्षेत्रांत आठवली जाते. ३ मार्च १९०० ला त्यांना आपल्या सैन्यासह जम्कपोई जंगलात अटक करण्यात आले. एकूण ४६० लोकांना पकडण्यात आले ज्यापैकी एकाला फाशी, ३९ लोकांना देशातून हद्दपार केले आणि १२ लोकांना १४ वर्षांचा तुरुंगवास झाला. बिरसा मुंडा यांचा त्याच वर्षी रांचीच्या तुरुंगात कॉलरा मुळे मृत्यू झाला.