Android app on Google Play

 

भिकाजी कामा

 


१९०७ साली, जेव्हा भारतीय स्वातंत्र्य संग्राम स्वतंत्र्यापासून खूप दूर होता, श्रीमती कामा यांनी पहिल्यांदा भारताचा तिरंगा ध्वज जर्मनीत अनेक देशांच्या प्रतिनिधींसमोर आंतरराष्ट्रीय समाजवादी सभेत फडकवला होता. कामा त्या काही मोजक्या लोकांमध्ये मोडतात ज्यांनी वीर सावरकरांना त्यांच्या कैदेतून सुटण्यासाठी मदत केली होती. खरे म्हणजे अगोदर त्या हिंसक प्रवृत्तींच्या विरुद्ध होत्या, परंतु नंतर देशवासीयांचे हाल पाहून त्या देखील क्रांतिकारी दलात सामील झाल्या.