Android app on Google Play

 

वीर सावरकर

 


सावरकरांबद्द्ल किती आणि काय सांगायचे! एक महान विद्वान, एक महान वक्ता, इतिहासकार, महान कवी, तत्वज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ता असलेल्या वीर सावरकरांनी अभिनव भारत दलाची सुरुवात केली. त्यांच्या प्रक्षोभक देशभक्तीपर भाषणांमुळे इंग्रज सरकारने त्यांची पदवी जप्त केली. १९०६ मध्ये ते इंग्लंड येथे वकिलीचा अभ्यास करण्यासाठी म्हणून गेले. लंडन मध्ये त्यांनी फ्री इंडिया सोसायटी ची सुरुवात केली आणि तिथल्या विद्यार्थ्यांना इंग्रज हुकुमतीविरुद्ध भडकावले.