कमला देवी चट्टोपाध्याय
थिएटर ची माहितगार कमलादेवी यांना भारतीय स्वतंत्रता संग्रामातील त्यांच्या योगदानासाठी ओळखण्यात येते. एका खंबीर व्यक्तिमत्वाच्या स्त्रीची मुलगी कमलादेवी यांनी त्या काळी विधवा पुनर्विवाहाची कोणतीही प्रथा नसताना दुसरा विवाह केला होता. मिठाच्या सत्याग्रहात भाग घेणाऱ्या २ महिलांपैकी एक असलेल्या कमालादेवीला पोलिसांनी सहभागाबद्दल अटक केली होती. स्वातंत्र्य संग्रामानंतर त्यांनी महिलांची सामाजिक स्थिती सुधारणे आणि थिएटर आणि कला क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी काम केले.