शारीरिक संबंध
शारीरिक संबंधांच्या वेळी नेहमी कंडोम चा वापर करण्याने एच. आय. व्ही. संसर्ग होण्याचा धोका ८० टक्क्यांनी कमी होतो. जेव्हा दोघांपैकी एक जोडीदार एच. आय. व्ही. बाधित असतो, तेव्हा कंडोम चा वापर करण्याने दुसऱ्या जोडीदाराला एच. आय. व्ही. संसर्ग होण्याची शक्यता प्रतिवर्षी १% ने कमी होते. या गोष्टीची देखील खात्री झाली आहे की महिलांचे कंडोम वापरणे हे देखील पुरुषांच्या कंडोम वापरण्याइतकेच सुरक्षित आहे. एका संशोधनानुसार आफ्रिकन महिलांमध्ये शरीर संबंधांच्या अगदी अगोदर तेनोफोविर नावाचे जेल त्यांच्या योनीवर लावल्यामुळे एच. आय. व्ही. संसर्गाचा धोका ४०% पर्यंत कमी झाला. परंतु याच्या उलट स्पेर्मिसईद नोंओक्स्य्नोल ९ (spermicide nonoxynol 9) च्या संसर्गाचा धोका मात्र वाढतो, कारण योनी आणि गुदद्वारात जळजळ निर्माण करणे आणि आग होणे हे त्याचे गुणधर्म आहेत. उप सहारा आफ्रिकेमध्ये सुन्नत (सुंता) विषमलिंगी पुरुषांमध्ये एच. आय. व्ही. संसर्गाचे प्रमाणाला ३८% ते ६६% प्रकरणांत २४ महिन्यांपर्यंत कमी करते. या निकषांच्या आधारे २००७ साली जागतिक आरोग्य संघटना आणि यु. एन. एड्स ने महिलांपासून पुरुषांनी एच. आय. व्ही. संसर्ग होण्यापासून वाचण्याचा उपाय म्हणजे पुरुषाची सुंता करणे हा सांगितला होता. अर्थात यापासून एच. आय. व्ही. संसर्ग रोखला जाऊ शकतो की नाही यावर अजूनही वादविवाद चालू आहेत. तसेच पुरुष सुंता विकसित देशांमध्ये काम करेल की नाही आणि समलैंगिक पुरुषांमध्ये याचा कितपत उपयोग होईल हे अजून निश्चित झालेले नाही. काही तज्ञांना अशी भीती आहे की सुंता केल्यामुळे पुरुषांमध्ये असुरक्षिततेची भावना कमी होईल आणि त्यामुळे उलट एच. आय. व्ही. संसर्गाचे प्रमाण वाढेल. ज्या महिलांचे जननेन्द्रिय कापलेले असते, त्यांच्यामध्ये एच. आय. व्ही. संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. यौन संयम शिकवणारे कार्यक्रम सुद्धा एच. आय. व्ही. च्या वाढत्या धोक्याला आळा घालू शकले नाहीयेत. शाळांमध्ये व्यापक प्रमाणावर यौन शिक्षण दिले तर हा धोका मोठ्या प्रमाणावर खाली आणता येऊ शकतो. युवा पिढीचा एक मोठा भाग, सर्व संभावित धोके माहिती असूनही या भ्रमात राहणे पसंत करतो की त्यांना कधीही एच. आय. व्ही. चा संसर्ग होऊ शकणार नाही.