Android app on Google Play

 

एच. आय. व्ही. संसर्गाचे तीन प्रमुख टप्पे

 

एच. आय. व्ही. संसर्गाचे तीन प्रमुख टप्पे आहेत - तीव्र संसर्ग, निदान होण्यातील विलंब आणि एड्स.तीव्र संसर्ग
एच. आय. व्ही. चा प्रारंभिक काळ, जो त्याचा संसर्ग झाल्यापासून सुरु होतो, त्याला तीव्र एच. आय. व्ही. किंवा प्राथमिक एच. आय. व्ही. किंवा तीव्र रेट्रोवायरल सिंड्रोम असं म्हणतात. अनेक लोकांमध्ये २ ते ४ आठवड्यात इन्फ्लूएंजा सारखा आजार किंवा मोनोंयुक्लिओसिस सारख्या आजाराची लक्षणे दिसू लागतात, तर काही लोकांमध्ये अशी कोणती विशेष लक्षणे दिसत नाहीत. ४०% ते ९०% प्रकरणात या आजाराची लक्षणे दिसू लागतात, ज्यामध्ये सर्वात मुख्य लक्षणे आहेत ताप येणे, मोठ्या प्रमाणावर लिम्फ नोड्स, घशाला सूज येणे, चट्टे, डोकेदुखी आणि तोंड किंवा जननेन्द्रीयांवर जखमा इत्यादी आहेत. २०% ते ५०% प्रकरणात चट्टे दिसतात. काही लोकांमध्ये या स्तरावर संसर्गजन्य संक्रमण देखील विकसित होते. काही लोकांमध्ये जठराचे विकार जसे की उल्टी, मळमळ, अतिसार आणि काहींमध्ये मज्जासंस्थेचे विकार आणि जुल्लैन बर्रे सिंड्रोम सारख्या आजारांची लक्षणे दिसतात. लक्षणांचा कालावधी सामान्यतः १ ते २ आठवडे इतका असतो. एड्सला आपली विशिष्ट लक्षणे नसल्याने लोक वरील लक्षणांना एच. आय. व्ही. संक्रमण समजत नाहीत. सर्व सामान्य आजारांची लक्षणे दिसत असल्याने अनेक वेळा डॉक्टर आणि हॉस्पिटल मध्ये देखील या रोगांचे चुकीचे निदान केले जाते. त्यामुळे जर एखाद्या रुग्णाला कोणत्याही कारणाशिवाय वारंवार ताप येत असेल तर त्याची एच. आय. व्ही. चाचणी करून घेतली पाहिजे, कारण हे एच. आय. व्ही. संक्रमणाचे एक लक्षण असू शकते.

निदानातील विलंब
या रोगाच्या प्राथमिक लक्षणांच्या पुढच्या टप्प्याला नैदानिक विलंब, स्पर्शोन्मुख एच. आय. व्ही. किंवा जुनाट एच. आय. व्ही. असे म्हटले जाते. उपचारांच्या अभावाने एच. आय. व्ही. संसर्गाचा दुसरा टप्पा ३ वर्षांपासून २० वर्षांपर्यंत राहू शकतो. ( सरासरी ८ वर्षे.) सामान्यतः या टप्प्यात काही किंवा कोणतीही लक्षे दिसत नाहीत. असे असूनही या टप्प्याच्या अखेरच्या काळात अनेक लोकांना ताप येणे, वजन कमी होणे, गैस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या आणि मांसपेशींतील वेदना यांचा अनुभव येतो.  जवळपास ५० - ७०% लोकांमध्ये ३ ते ६ महिन्यात लसिका ग्रंथी ( जांघेच्या बाजूच्या लसिका ग्रंथी व्यतिरिक्त) मध्ये सूज किंवा प्रसारण देखील पाहायला मिळते. एच.आय.व्ही.१ ने संक्रमित बहुतांश व्यक्तींमध्ये समजण्यासारखा एक वायरल लोड असतो परंतु उपचाराच्या अभावाने शेवटी तो वाढून त्याचे एड्स मध्ये रुपांतर होते. तर काही प्रकरणात (जवळपास ५%) एंटीरेट्रोवाइरल थेरेपी ( एड्स ची चिकित्सा पद्धती) शिवाय CD4+T-पेशी ५ वर्षांपेक्षा जास्त काळ शरीरात राहतात. ज्या लोकांमध्ये अशा प्रकारच्या अवस्था समोर येतात त्यांना एच. आय.व्ही. नियंत्रक किंवा दीर्घ काळासाठी वृधिविहीन मध्ये वर्गीकृत केलं जातं. तसेच ज्या व्यक्तींमध्ये रेट्रोवायरल विरोधी चिकित्से शिवाय वायरल लोड कमी किंवा न कळण्या इतक्या पातळीवर असते त्यांना अभिजात वर्गाचे नियंत्रक किंवा अभिजात वर्गाचे दमन करणारे म्हटले जाते.
एड्स
एड्सला २ प्रकारात विभागलेले आहे, एक म्हणजे जेव्हा CD4+ पेशींची संख्या २०० पेशी प्रति μL पेक्षा कमी होतात किंवा दुसरे म्हणजे एच.आय.व्ही. संसर्गामुळे कोणतातरी रोग शरीरात उत्पन्न होतो. विशिष्ट उपचारांच्या आभावी एच. आय. व्ह. बाधित अर्ध्या लोकांमध्ये दहा वर्षांच्या आत एड्स विकसित होतो. सर्वात सामान्य प्रारंभिक अवस्था जी एड्स च्या उपस्थितीला सूचित करते ती आहे न्युमोसाईटीस न्युमोनिया (40%), अशक्तपणा, वजन घटने, मांसपेशीत तणाव, थकवा, भूक न लागणे इत्यादी (२०%), आणि सोफागेल कैंडिडिआसिस (अन्ननलिकेचे संक्रमण) या आहेत. या व्यतिरिक्त श्वास नलिकेत अनेक वेळा संक्रमण होणे ही देखील आहे. संसर्गजन्य आजार बैक्टीरिया, वायरस, कवक आणि परजीवी यांच्यापासून होऊ शकतात, जे सामान्यतः शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीने नियंत्रित केले जाऊ शकतात. विविध व्यक्तींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संसर्ग किंवा लागण होऊ शकते. व्यक्तीच्या आजूबाजूला कोणते परजीवी किंवा आजार वास्तव्याला आहेत, यावर ही गोष्ट अवलंबून असते. असे संसर्ग संपूर्ण शरीराच्या प्रत्येक अंगाच्या कार्यप्रणालीवर परिणाम करू शकतात.