एड्स आणि एच.आई.व्ही. मधला फरक
एच. आय. व्ही. हा एक अतिसूक्ष्म विषाणू आहे ज्याच्या संसर्गामुळे एड्स होऊ शकतो. एड्स स्वतःमध्ये कोणताही रोग नाही, केवळ एक लक्षण आहे. याचा संसर्ग मनुष्याची अन्य रोगांपासून बचाव करणारी रोगप्रतिकारक शक्तीचा खात्मा करतात. रोग प्रतिकारक क्षमतेच्या सातत्याने घटत जाण्यामुळे कोणताही संसर्गजन्य रोग, म्हणजे अगदी सामान्य सर्दी - पडसे, फुफ्फुसांचा दाह, इथपासून ते अगदी क्षय रोग (टीबी), कर्करोग यांच्यासारखे आजार मनुष्याला अगदी सहजपणे आपल्या जाळ्यात ओढू शकतात आणि त्यांचा इलाज करणे अतिशय कठीण होऊन जाते, आणि त्यातूनच मग रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो. या कारणामुळे एड्स चे योग्य परीक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. केवळ एड्स च्या परीक्षणानेच निश्चितपणे संसर्गाचे अनुमान लावले जाऊ शकते.