Get it on Google Play
Download on the App Store

एच.आई.वी. चा प्रसार


जगभरात या क्षणी जवळ जवळ ४ कोटी २० लाख लोक एच. आय. व्ही. ची शिकार बनले आहेत. यापैकी दोन तृतीयांश लोक सहाराला लागून असलेल्या आफ्रिकन देशांमध्ये राहतात आणि त्या क्षेत्रात जिथे या रोगाची लागण सर्वात जास्त आहे, तिथे ३ पैकी १ वयस्कर व्यक्ती या रोगाची शिकार आहेत. जगभरात रोजच्या रोज जवळ जवळ १४,००० नवीन लोक या रोगाची शिकार बनत चालले आहेत, आणि त्यामुळे हा रोग लवकरच संपूर्ण आशियाला पाछाडेल अशी भीती निर्माण झाली आहे. जोपर्यंत रामबाण उपाय शोधला जात नाही, तोपर्यंत एड्स पासून बचाव हाच एड्स वरचा सर्वोत्तम उपाय आहे.



एच.आई.वी. तीन मुख्य मार्गांनी पसरतो -
•    मैथुन किंवा संभोगाद्वारे (गुदा, योनी किंवा मुख)
•    शरीरातील संक्रमित तरल पदार्थ किंवा पेशींद्वारे (रक्त संसर्ग किंवा सुयांचे आदान - प्रदान)
•    आईपासून मुलाला (गर्भावस्था, प्रसुती किंवा स्तनपानातून)
मल, कफ, लाळ, थुंकी, घाम, अश्रू, मुत्र किंवा उल्टी यांपासून एच. आय. व्ही. चा संसर्ग होण्याचा धोका तोपर्यंत नसतो जोपर्यंत या गोष्टी एच. आय. व्ही. बाधित रक्ताच्या संपर्कात येत नाहीत.