गुरुभक्त एकलव्य
एकलव्याची कथा आपल्याला महाभारतात पाहायला मिळते. महाभारतानुसार एकलव्य निषादराज हिरण्यधनु याचा पुत्र होता. तो गुरु द्रोणाचार्य यांच्याकडे धनुर्विद्या शिकण्याच्या इच्छेने गेला होता, परंतु राजवंशातील नसल्याने द्रोणाचार्यांनी त्याला शिकवण्यास नकार दिला. तेव्हा मग त्याने गुरु द्रोणाचार्यांचा एकक पुतळा बनवला आणि त्यालाच आपला गुरु मानून धनुर्विद्येचा अभ्यास सुरु केला. एकदा गुरु द्रोणाचार्य यांच्या सोबत सर्व राजकुमार शिकार करण्यासाठी त्या वनात गेले.
त्या वनात एकलव्य अभ्यास करत होता. अभ्यासाच्या वेळी कुत्र्याच्या भुंकण्याने व्यत्यय आला म्हणून एकलव्याने आपल्या बाणांनी त्या कुत्र्याचे तोंड बंद केले. ते देखील एवढ्या कुशलतेने की इतके बाण तोंडात मारून देखील, कुत्र्याचे भुंकणे बंद झाले, परंतु त्याला जरा देखील इजा झाली नाही. जेव्हा द्रोणाचार्य आणि राजकुमारांनी कुत्र्याला त्या अवस्थेत पहिले, तेव्हा ते त्या कुशल धनुर्धारीला शोधायला लागले. एकलव्य भेटल्यावर द्रोणाचार्यांनी त्याला त्याच्या गुरूबद्दल विचारले. त्याने सांगितले की प्रतिमेच्या रुपात द्रोणाचार्यांनाच त्याने आपले गुरु मानले आहे. तेव्हा अर्जुनाला चिंता लागली की हा आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा म्हणून एकलव्य कडून त्याच्या उजव्या हाताचा अंगठा मागितला आणि गुरुभक्त एकलव्याने गुरुभक्ती म्हणून त्यांना अंगठा कापून दिला देखील. धान्य तो एकलव्य. आणि धान्य त्याची गुरुभक्ती.