Android app on Google Play

 

गुरुभक्त अरुणी

 


महाभारतानुसार आयोदधौम्य नावाचे एक ऋषी होते. त्यांचा एक शिष्य होता अरुणी. तो पांचाल देशाचा रहिवासी होत. अरुणी आपल्या गुरूंच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करत आले. एकदा गुरूंनी त्याला शेतात पाट बांधायला सांगितले. छोटा अरुणी गुरूंच्या आज्ञेवरून शेतात जाऊन पाट बांधायचा प्रयत्न करू लागला. पण काही केल्या त्याला तो पाट बांधायला काही जमेना. बांधला की लगेचच पाण्याच्या वेगाने माती ढासळून जाई आणि पाट मोडून जाई. तेव्हा शेवटी केवळ गुरूंच्या आज्ञेचे पालन व्हावे आणि शेतात पाणी जाऊ नये यासाठी आरुणी स्वतः पाटाच्या जागेवर झोपला. खूप उशीर झाला तरी अरुणी आश्रमात आला नाही म्हणून गुरु बाकी काही शिष्य सोबत घेऊन त्याला शोधत शेतात पोचले. आणि त्याला हाका मारू लागले. गुरूंचा आवाज ऐकून आरुणी उठून उभा राहिला. जेव्हा त्याने सर्व वृत्तांत आपल्या गुरूंना सांगितला तेव्हा त्याची ही परम गुरुभक्ती पाहून गुरु अति प्रसन्न झाले आणि त्याला सर्व वेद आणि धर्मशास्त्र यांचे उत्तम ज्ञान मिळेल असा आशीर्वाद दिला.