Android app on Google Play

 

मार्कण्डेय ऋषी

 


धर्म ग्रंथांनुसार मार्कंडेय ऋषी अमर आहेत. आठ अमर महात्म्यांमध्ये मार्कंडेय ऋषींचे देखील नाव आहे. मर्कण्डु ऋषी हे त्यांचे वडील होते. मर्कण्डु ऋषींना कोणतेही अपत्य होत नव्हते म्हणून त्यांनी आपल्या पत्नीच्या सोबत भगवान शंकराची आराधना केली. त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन भगवान शंकर प्रकट झाले आणि त्यांनी ऋषींना विचारले की तुम्हाला गुणहीन दीर्घायुषी पुत्र हवा आहे की गुणवान १६ वर्षांचा अल्पायुषी पुत्र पाहिजे आहे? ऋषींनी भगवंताला सांगितले की मला गुणी पुत्र पाहिजे, मग तो अल्पायुषी असला तरी चालेल. भगवान शंकरांनी त्यांना तासे वरदान दिले. जेव्हा मार्कंडेय ऋषी १६ वर्षांचे होणार होते, तेव्हा त्यांना आपल्या आईकडून ही गोष्ट समजली. आपल्या मृत्यू बाबत समजून देखील ते विचलित झाले नाहीत आणि भगवान शंकराच्या भक्तीत गुंग होऊन गेले. या दरम्यान सप्तर्षींच्या सहाय्याने ब्रम्हदेवाने त्यांना महामृत्युंजय मंत्राची दीक्षा दिली. या मंत्राचा परिणाम असा झाला की जेव्हा यमराज ठरलेल्या वेळी मार्कंडेय ऋषींचे प्राण घेण्यासाठी आले तेव्हा शिवभक्ती मध्ये लीन असलेल्या मार्कंडेय ऋषींच्या रक्षणासाठी स्वतः भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी यमराजाचा वार निष्क्रिय केला. बालक मार्कंडेय याची निस्सीम भक्ती पाहून शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला अमर होण्याचे वरदान दिले.