आस्तिक
महाभारतानुसार आस्तिकनेच राजा जनमेजय याचा सर्प यज्ञ थांबवला होता. ऋषी जरत्कारू हे आस्तिक चे वडील होते आणि त्याच्या मातेचे नाव देखील जरत्कारूच होते. आस्तिक ची आई ही नागराज वासुकी याची बहिण होती. जेव्हा राजा जनमेजय याला समजले की आपल्या वडिलांचा मृत्यू तक्षक नावाचा सर्प चावल्यामुळे झाला होता तेव्हा त्याने सर्प यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. त्या यज्ञात दूर दूर वरून भयानक सर्प येऊन पडू लागले. जेव्हा ही गोष्ट नागराज वासुकी याच्या लक्षात आली तेव्हा त्याने आस्तिकला हा यज्ञ थांबवण्याची विनंती केली.
यज्ञ स्थळावर जाऊन आस्तिकने अनेक अशा ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या ज्या ऐकून राजा जनमेजय खूप प्रसन्न झाला. जनमेजय राजाने आस्तिक ला वरदान मागायला सांगितले, तेव्हा आस्तिक ने सर्प यज्ञ थांबवा असे निवेदन केले. राजा जनमेजय याने आधी तसे करण्यास नकार दिला, परंतु नंतर तिथे उपस्थित ब्राम्हणांच्या सांगण्यावरून त्याने यज्ञ थांबवला आणि आस्तिक ची प्रशंसा केली.