Get it on Google Play
Download on the App Store

भक्त प्रल्हाद


भक्त प्रल्हादाचे वर्णन आपल्याला भगवत गीतेत वाचायला मिळते. प्रल्हादाचे वडील दैत्य हिरण्यकश्यपू हा दैत्यांचा राजा होता. तो भगवान विष्णूंना आपला शत्रू मनात असे. परंतु त्याचाच मुलगा प्रल्हाद हा मात्र भगवान विष्णूंचा परम भक्त होता. ही गोष्ट जेव्हा हिरण्यकश्यपू याच्या लक्षात आली तेव्हा त्याने प्रल्हादाला तसे न करण्यास बजावले. त्याने ऐकले नाही म्हणून त्याच्यावर अनेक अत्याचार केले, परंतु प्रल्हादाची ईश्वर भक्ती काही कमी झाली नाही. शेवटी स्वतः भगवान विष्णूंनी प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी नृसिंह रुपात अवतार घेतला. भगवान नृसिंहाने हिरण्यकश्यपूचा आपल्या नखांनी पोट फाडून वध केला आणि प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसवून त्याच्यावर माया केली.