श्री राजस्थलेश्वर महादेव
अनेक वर्षांपूर्वी एकदा कोणताही राजा शिल्लक नव्हता. ब्रम्हदेवाला चिंता वाटू लागली कि राजा नसेल तर प्रजेचे पालन कोण करणार? यज्ञ, हवन, धर्माचे रक्षण कोण करेल? त्या दरम्यान त्यांनी राजा रिपुंजय याला तपश्चर्या करताना पहिले आणि त्याला सांगितले कि राजा आता तू तपश्चर्या सोडून प्रजेचे पालन कर. सर्व देवता तुला वश राहतील आणि तू पृथ्वीवर राज्य करशील. राजाने ब्रम्हदेवाच्या शब्दाला मान देऊन सर्व देवतांना स्वर्गात राज्य करण्यास पाठवले आणि स्वतः पृथ्वीवर राज्य करू लागला. राजाचे प्रताप पाहून इंद्राला मत्सर वाटला आणि त्याने वर्षा थांबवली. तेव्हा राजाने वायूचे रूप घेऊन या समस्येचे निवारण केले. इंद्राने अग्निचे रूप घेऊन यज्ञ, हवन सुरु केले. एक दिवस भगवान शंकर माता पार्वतीसोबत फिरत अवंतिका नगरीत आले. राजाने त्यांना प्रसन्न करून त्यांच्याकडून वरदान म्हणून राजस्थलेश्वर रूपाने तिथेच वास्तव्य करण्यास सांगितले.
राजाच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकराने त्याला वरदान दिले. तेव्हापासून भगवान शंकर राजस्थलेश्वर महादेवाच्या रुपात अवंतिका नगरीत वास्तव्य करून आहेत.
असे मानले जाते कि जो कोणी मनुष्य राजस्थलेश्वर महादेवाचे पूजन करतो त्याचे मनोरथ पूर्ण होते आणि त्याच्या शत्रूचा विनाश होतो. त्याच्या वंशात बुद्धी वास करते, आणि तो मनुष्य पृथ्वीवर सर्व सुख उपभोगुन अंती त्याला सद्गती प्राप्त होते. हे मंदिर भागसीपुरा मध्ये आनंद भैरव जवळ एका गल्लीत वसलेले आहे.