Android app on Google Play

 

श्री अभिमुक्तेश्वर महादेव

 


शाकल नावाच्या नगरात चित्रसेन नावाचा राजा होता. त्याच्या राणीचे नाव होते चंद्रप्रभा. राजा राणी दोघेही रूपवान होते. त्यांना एक कन्या झाली, ती देखील अत्यंत सुंदर होती. म्हणून राजाने तिचे नाव लावण्यवती ठेवले. लावण्यावातीला मागच्या जन्मातील गोष्टी आठवत होत्या. लावण्यवती तरुण झाली तेव्हा राजाने तिला बोलावून विचारले कि तुझे लग्न मी कोणाशी करून देऊ? राजाचे बोलणे ऐकून लावण्यवती कधी रडू लागे तर कधी हसत असे. राजाने याचे कारण विचारले तेव्हा तिने सांगितले कि पूर्व जन्मात ती प्राग्ज्योतिषपुर मध्ये हरस्वामीची स्त्री होती. रूपवान असून देखील तिचा पती ब्राम्हचर्याचे पालन करत असे. तिच्यावर चिडून राहत असे. एकदा ती आपल्या वडिलांच्या घरी गेली आणि तिने सर्व वृत्तांत सांगितला. तिच्या वडिलांनी तिला काही मंत्र आणि मंतरलेल्या वस्तू दिल्या, ज्यामुळे तिचा पती तिला वश झाला. पतीसोबत सुखी जीवन व्यतीत केल्यानंतर तिचा मृत्यू झाला, परंतु ती नरक लोकात गेली. तिथे अनेक प्रकारच्या यातना सोसून झाल्यावर आपल्या पापांचा काही प्रमाणात नाश करण्यासाठी एका चांडाळाच्या घरात तिचा जन्म झाला.
इथे सुंदर रूप मिळाल्यानंतर तिच्या शरीरावर फोड उठले आणि जनावरे तिला चावू लागली. त्यांच्यापासून बचाव व्हावा म्हणून ती पळून महाकाल वनात आली. इथे तिने भगवान शंकर आणि पिप्लादेश्वर यांचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यामुळे तिला स्वर्ग प्राप्ती झाली.  स्वर्गात देवतांच्या सोबत राहिल्यामुळे माझा तुमच्याकडे जन्म झाला आहे. तिने राजाला सांगितले कि या जन्मातही मी अवंतिका नगरीत जाऊन भगवान शंकरांचे दर्शन घेणार. राजा आपल्या सैन्यासह महाकाल वनात गेला आणि आपल्या कन्यारत्नासोबत भगवान शंकराचे दर्शन घेतले. लावण्यवती इथे शंकराचे पूजन करून देहत्याग करून शिवात विलीन होऊन गेली. पार्वतीने शिवलिंगाला अभिमुक्तेश्वर असे नाव दिले.
असे मानले जाते कि जो कोणी मनुष्य अभिमुक्तेश्वर महादेवाचे दर्शन - पूजन करतो त्याला मुक्ती नक्कीच मिळते. त्याला मृत्यूचे भय उरत नाही. हे मंदिर सिंहपुरी इथल्या मंगलनाथ मंदिराच्या जवळ आहे.