Get it on Google Play
Download on the App Store

श्री बिल्वेश्वर महादेव


एकदा ब्रम्हदेवाने ध्यान लावले ज्यातून कल्पवृक्ष उत्पन्न झाला. त्याच्या खाली एक पुरुष आराम करत होता. ब्रम्हदेव आले आणि त्याला बिल्व दिले. ब्रम्हदेव गेल्यानंतर तिथे इंद्र आला आणि त्याला पृथ्वीवर राज्य करण्यास सांगितले. बिल्व प्राप्त पुरुषाने म्हटले कि इंद्राचे वज्र मिळाले तर तो पृथ्वीवर राज्य करेल. इंद्राने सांगितले कि जेव्हा कधी तू वज्राचे स्मरण करशील तेव्हा वज्र तुझ्यापाशी येईल. यानंतर त्या पुरुषाचे नावच बिल्व असे पडले. बिल्व पृथ्वीवर राज्य करू लागला. कपिल मुनी आणि राजा बिल्व यांच्यात मैत्री झाली. एकदा धर्मवार्ते च्या दरम्यान दोघं भांडू लागले. बिल्वाने भगवान विष्णुंची उपासना करून वरदान मागितले कि कपिल मुनींनी त्याला घाबरावे. वरदान देऊन भगवान विष्णू कपिल मुनींकडे गेले. त्यांना सांगितले कि त्यांनी बिल्वाला सांगावे कि मी तुला घाबरतो. कपिल मुनींनी नकार दिला. बिल्व प्रलाप करू लागला. कपिल त्याला घाबरत नाहीत हे पाहून इंद्राने त्याला सांगितले कि बिल्वा, तू महाकाल वनात पश्चिम दिशेला असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घे. त्यामुळे तुला विजय प्राप्त होईल.
बिल्व महाकाल वनात गेला आणि तिथे जाऊन त्याने शिवाचे दर्शन घेऊन पूजा केली. त्याच दरम्यान कपिल मुनी तिथे पोचले. त्यांनी पहिले कि बिल्वाच्या शरीरात तर शिव आहेत, तेव्हा त्यांनी बिल्वाला सांगितले कि तू मला जिंकलेस. मी माझा पराभव कबूल करतो. राजा बिल्वाच्या दर्शन आणि पूजेमुळे हे शिवलिंग बिल्वेश्वर महादेव या नावाने प्रसिद्ध झाले. असे मानले जाते कि जो मनुष्य बिल्वेश्वर शिवलिंगाचे दर्शन करेल, तो सर्व पापांपासून मुक्त होईल, आणि अंती शिवलोकात जाईल. हे मंदिर अंबोदिया गावात आहे.