Get it on Google Play
Download on the App Store

श्री कायावरोहणेश्वर महादेव


प्रजापती दक्ष याच्या यज्ञात भगवान शंकराला आमंत्रित न केल्यामुळे उमा क्रोधीत झाली आणि तिने शक्तीपासून भद्रकाली माया उत्पन्न केली. दुसरीकडे उमाच्या यज्ञात भस्म होऊन जाण्यामुळे क्रोधीत होऊन वीरभद्राला यज्ञाचा नाश करायला पाठवले. भद्रकाली आणि वीरभद्र यांनी मिळून यज्ञाच्या स्थळावर हाहाःकार उडवला. त्यांनी देवतांना छळले. अनेक देवता प्रकोपामुळे कायाहीन झाले. काही देवता भयाने ग्रस्त होऊन ब्रम्हदेवाकडे शरण आले. ब्रम्हदेव कैलास पर्वतावर आले आणि भगवान शंकराची स्तुती करून देवतांना पुन्हा काया कशी मिळेल याचा उपाय विचारला. तेव्हा भगवान शंकरांनी सांगितले, महाकाल वनात दक्षिण द्वारावर स्थित कायावरोहणेश्वर शिवलिंगाचे दर्शन करा. हे ऐकून सर्व देवता महाकाल वनात आले आणि त्यांनी शिवलिंगाचे दर्शन घेऊन आराधना केली आणि काया परत मिळवली. देवतांना काया पुन्हा प्राप्त झाल्यामुळे हे शिवलिंग कायावरोहणेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले. असे मानले जाते कि जो कोणी मनुष्य या शिवलिंगाचे दर्शन घेतो, तो पृथ्वीवर उत्तम राज्य सुख उपभोगुन अंती स्वर्गाला जातो. हे मंदिर करोहन गावात वसलेले आहे.