Get it on Google Play
Download on the App Store

श्री हनुमंत्केश्वर महादेव


भगवान श्रीरामाने धरतीवर रावण आणि अन्य राक्षसांचा वध केला आणि ते अयोध्येवर राज्य करू लागले. तेव्हा काही ऋषी - मुनी त्यांचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या राज्यात उपस्थित झाले. मुनींनी प्रभू श्रीरामांच्या पुढे जाऊन त्यांची आराधना केली. त्यांचे गुणगान गायले. मुनी म्हणाले कि तुम्ही रावणाच्या कुळाचा नाश केलात, यामध्ये हनुमानाने तुम्हाला सहाय्य केले. वानरांनी ते युद्ध प्रत्यक्ष पहिले. तेव्हा श्रीराम म्हणाले कि मुनींनो, तुम्ही हनुमानाच्या पराक्रमाचे वर्णन केलेत, परंतु लाक्ष्मणानेही युद्ध केले आणि मेघनाथाचा वध केला. तेव्हा ऋषीगण म्हणाले कि हनुमानाचा पराक्रम सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. रामाने असे बोलण्यामागचे कारण विचारले तेव्हा ऋषींनी सांगितले कि हनुमान जेव्हा लहान बालक होता तेव्हा एका वेळी सूर्याला फळ समजून खाण्यासाठी गेला होता. इंद्राने आपल्या वज्राने त्याच्यावर प्रहार केला, ज्यामुळे त्याच्या ओठांवर जखम झाली आणि तो एका पर्वतावर पडला. वायुदेव त्याला घेऊन महाकाल वनात आला आणि इथे येऊन शिवलिंगा समोर भगवान शंकराची आराधना करू लागला. शिवलिंगाचा स्पर्श झाल्यावर हनुमान जिवंत झाला. या दरम्यान इथे सर्व देवता आले आणि त्यांनी हनुमानाला वरदान दिले. ऋषींच्या शापाच्या प्रभावामुळे हनुमान आपली शक्ती विसरला होता. समुद्र पार करण्याच्या वेळी जाम्बुवंताने हनुमानाला त्याच्या शक्तीची आठवण करून दिली होती. हनुमानाचा शिवलिंगाला स्पर्श आणि रावणाच्या वधानंतर केलेली पूजा यामुळे हे शिवलिंग हनुमंत्केश्वर महादेव या नावाने प्रसिद्ध झाले. असे मानले जाते कि जो कोणी मनुष्य या शिवलिंगाची पूजा करतो, त्याच्या मनोकामना पूर्ण होतात. हे मंदिर ओखलेश्वरला जाणाऱ्या मार्गावर वसलेले आहे.