Android app on Google Play

 

किश्तवार कैलास रस्ता

 


किश्तवार आणि कैलासाच्या शिबिराला जोडणारा रस्ता हा जगातील सर्वात धोकादायक रस्त्यांपैकी एक आहे. तो जम्मू आणि काश्मीरच्या जम्मू भागातील किश्तवार जिल्ह्याच्या पूर्वेला स्थित आहे. या रस्त्यापर्यंत पोचण्यासाठी तुम्ही पश्चिमेकडून येऊन रोहतांग पास, मनाली, चेनाब व्हेली, आणि दर्लंग व्हेली या मार्गाने डोंगराच्या पायथ्यापर्यंत पोहोचू शकता. चढण फारच अवघड आहे. त्यातच पुन्हा ऑक्सिजनची कमतरता, आणि तीव्र उतार यामुळे प्राण्यांना फारच प्रयास पडतात.