Android app on Google Play

 

सत्तेत पुनरागमन : २०००

 

साल २०००मध्ये शाहरुख सोबत सहकलाकाराच्या रुपात परत आले. साल २००५मध्ये सर्वोत्कृष्ठ फिल्म अभिनेता म्हणून अमिताभ यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. सन २००० मध्ये अमिताभ बच्चन जेव्हा आदित्य चोप्रा निर्देशित फिल्म मोहब्बते मध्ये शाहरुख समोर एका कठोर भूमिकेत होते तेव्हा त्यांना त्यांचा हरवलेला मानसन्मान परत मिळाला. प्रेक्षकांनी बच्चनयांच्या कामाची दखल घ्यायला सुरवात केली होती. या चित्रपटात त्यांनी त्यांच्या वयाला शोभेल अशी भूमिका केली होती. त्यांच्या पितृ रुपात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये कभी ख़ुशी कभी गम (२००१), बागबान (२००३) या आहेत. एका अभिनेत्याच्या स्वरुपात स्वताःहाच्या चरित्राला शोभतील अशा भूमिका करायला त्यांनी सुरवात केली. अक्स, खाकी, आंखे, देव आणि ब्ल्याक सारख्या चित्रपटांनी त्यांना त्यांच्या चाहत्यांकडून खूप प्रशंसा मिळवुन दिली. याचा फायदा घेऊन अमिताभ यांनी अनेक टेलीविजन आणि जाहिरातींना उपस्थिती राहून वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन आणि सेवांचा प्रचार करण्याचे कार्य सुरु केले. २००५ साली त्यांनी त्यांचा मुलगा अभिषेक बरोबर बंटी और बबली, सरकार (२००५), कभी अलविदा ना केहना (२००६), या सारख्या चित्रपटांमध्ये स्टार कलाकाराची भूमिका केली. हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट राहिले. २००६ आणि २००७ च्या सुरवातीला रिलीज झालेल्या त्यांच्या बाबुल(२००६),  नि:शब्द ,एकलव्य (२००७), हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतके चालले नाहीत. पण त्यांच्या कलाप्रदर्शनाचे लोकांनी खूप कौतुक केले.

त्यांनी चंद्रशेखर नागाथाहल्ली यांच्या निर्देशनाखाली बनत असलेली कन्नड फिल्म अमृतधारा यात पाहुणा कलाकाराची भूमिका केली. मे २००७ मध्ये त्यांची चीनी कम आणि शूटआउट एट लोखंडवाला रिलीज झाली. शूटआउट एट लोखंडवाला बॉक्स ऑफिसवर खूप चालली. भारतात ह्या चित्रपटाला हिट घोषित करण्यात आल. चीनी काम या चित्रपटाने हळुवार सुरवात करत शिखर गाठलं. ओगस्ट २००७ मध्ये १९७५ मधली शोले ह्या हिट फिल्मचा रिमेक तयार करण्यात आला. हि फिल्म बॉक्स ऑफिसवर चांगलीच आपटली. त्यांची पहिली इंग्रजी भाषेतील फिल्म रितुपर्णा घोष थे लास्ट ईयर चे टोरंटो अंतराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल २००७ मध्ये प्रीमियर झालं. ब्लाक या चित्रपटात त्यांनी सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केलं. बच्चन हे शांताराम नावाच्या चित्रपटात सहायक अभिनेत्याच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिकेत हॉलीवूडचे नायक जॉनी डेप हे आहेत. या चित्रपटच फिल्मांकन २००८ मध्ये सुरु होणार होता पण लेखकाच्या संपामुळे ते थांबवण्यात आलं.
९ मे २००८ मध्य भूतनाथ चित्रपटात त्यांनी भुताची भूमिका केली. जून २००८ मध्ये त्यांची नवीन फिल्म सरकारराज हि २००५मध्ये आलेल्या सरकारचा एक भाग होता.