Android app on Google Play

 

सुरवातीचा जीवन काळ

 

अलाहाबाद, उत्तरप्रदेश मध्ये जन्माला आलेले अमिताभ बच्चन हे हिंदू कायस्थ परिवारातून होते. त्यांचे वडील, डॉ. हरिवंश राय बच्चन हे सुप्रसिद्ध हिंदी कवी होते. आणि त्यांची आई तेजी बच्चन ह्या कराचीच्या शीख परिवारातून होत्या. सुरवातीला बच्चन याचं नाव इंकलाब ठेवण्यात आल होतं. जे भारतीय स्वातंत्र्य संग्रामात प्रयोग करण्यात आलेल्या इंकलाब जिंदाबाद  या वाक्याशी प्रेरित होत. पण नंतर त्यांच नाव बदलून पुन्हा अमिताभ ठेवण्यात आलं ज्याचा अर्थ “ असा प्रकाश जो कधीही विझणार नाही” असा आहे. आधी त्यांच आडनाव श्रीवास्तव होतं, तरीही त्यांच्या वडिलांनी त्यांच आडनाव त्यांच्या कृतीना प्रकाशित करणाऱ्या बच्चन या नावावर ठेवलं. या त्यांच्या  आडनावाचा उपयोग त्यांनी चित्रपट आणि सार्वजनिक ठिकाणी केला. आता हे नाव त्यांच्या समस्त परिवाराच आडनाव झालं आहे. हरिवंश राय बच्चन यांच्या दोन मुलांमध्ये अमिताभ हे मोठे होते, त्यांचा दुसऱ्या मुलाचं नाव अजिताभ आहे. त्यांच्या आईला रंगमंच्याची फार आवड होती. आणि त्यांना अभिनय करण्याची संधीही मिळाली होती पण त्यांनी गृहिणी होण पसंत केल. अमिताभला अभिनेता म्हणून करिअर निवडण्यात त्यांच्या आईचाही थोडा वाटा आहे कारण ती नेहमी त्यांना सेंटर स्टेजवर काम करण्यासाठी प्रोसाहन देत होती. अमिताभ बच्चन यांचे वडील २००३ मध्ये वारले आणि आई २००७ मध्ये. बच्चन यांनी दोन वेळा एम. ए. ची पदवी घेतली. मास्टर ऑफ आर्ट्स त्यांनी अलाहाबाद मधल्या ज्ञान प्रबोधिनी आणि बॉयेस हायस्कूल मधून केलं  त्यानंतर नैनिताल मधल्या शेरवुड कॉलेजमध्ये कला संचय मध्ये प्रवेश घेतला. नंतर ते पुढील शिक्षणासाठी दिल्ली विश्वविद्यालयातील किरोडीमल कॉलेज मध्ये गेले जिथे त्यांनी विज्ञान स्नातक ही उपाधी घेतली. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी अभिनयात करियर करण्यासाठी कलकत्ता येथे असलेली एक शिपिंग फर्म बर्ड एंड कंपनी मधली ब्रोकरची नोकरी सोडली. ३ जुन १९७३ मध्ये त्यांनी बंगाली संस्कृतीनुसार अभिनेत्री जया भादुरी हिच्याशी विवाह केला. या जोडप्याला दोन मुले झाली. मुलगी श्वेता आणि मुलगा अभिषेक.


बच्चन यांनी त्यांच्या चित्रपट करियरची सुरवात ख्वाजा अहमद अब्बास यांच्या निर्देशनाखाली बनलेली सात हिंदुस्तानी मधल्या सात कलाकारानपैकि एका कलाकाराच्या स्वरुपात केली. या चित्रपटात त्यांच्या सोबत  उत्पल दत्त, मधु आणि जलाल आगा हे कलाकार होते. या चित्रपटाने जास्त आर्थिक उत्पन्न मिळवलं नाही पण बच्चन यांनी आपल्या पहिल्या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ नवकलाकार हा पुरस्कार जिंकला होता. ह्या सफल व्यावसायिक चित्रपटानंतर त्यांचा आणखी एक चित्रपट आला आनंद (१९७१) त्यात त्यांनी त्यावेळचे लोकप्रिय कलाकार राजेश खन्ना यांच्या सोबत काम केलं. त्यात त्यांनी डॉ. भास्कर बेनार्जी यांची भूमिका केली जे एका कर्करोग्याचा उपचार करतात. यामध्ये देशातल्या वास्तवीकतेचे प्रदर्शन त्यांनी या चित्रपटात केले आहे, ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ठ सहायक अभिनेता म्हणून फिल्मफेअर पारितोषिक मिळाले आहे. त्यानंतर अमिताभ यांनी (१९७१) मध्ये आलेल्या परवाना मध्ये एका नाराज प्रेमीची भूमिका केली. या चित्रपटात त्यांच्या सोबत नवीन निश्चल, योगिता बाली आणि ओम प्रकाश होते. त्यानंतर त्यांचे बरेच चित्रपट आले पण ते बॉक्स ऑफिसवर इतके चालले नाहीत. ज्यामध्ये रेश्मा और शेरा (१९७१) हि आहे. त्याचवेळी त्यांनी गुड्डी सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका केली. त्या चित्रपटात त्यांची पत्नी जया भादुरी आणि धर्मेंद्र हे एकत्र काम करत होते. आपल्या जबरदस्त आवाजाने ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांनी करीयरच्या सुरवातीलाच बावर्ची चित्रपटातील काही भाग नंतर वर्णन केले होते. १९७२ साली एस. रामनाथन यांच्या निर्देशनाखाली आलेली फिल्म बॉम्बे टू गोवा मध्ये त्यांनी काम केलं या चित्रपटात त्यांच्या सोबत अरुणा इरानी, महमूद, अनवर आली, नासीर हुसेन यां सारखे कलाकार होते. त्यांचा संघर्षाच्या वेळी ते ७ वर्ष अभिनेता निर्देशक आणि हास्य अभिनयाचे बादशाह मेहमूद यांच्या घरी राहिले.