Android app on Google Play

 

निर्माता आणि अभिनय :१९९६ – १९९९

 

सेवानिवृत्ती नंतर बच्चन निर्मितीकडे वळले. त्यांनी कोर्पोरेशन लिमिटेडची स्थापना केली. (ए.बी.सी.एल), १९९६ मध्ये २००० पर्यंतची सर्वात मोठी मनोरंजन कंपनी बनवण्याचं स्वप्नं त्यांनी पाहिलं यासाठी १० बिलियन रुपये खर्च करण्यात आले. (ए.बी.सी.एल) चा उद्देश भारतातील मनोरंजन उद्योगातील वर्गाना सेवा देण्याचा होता. यात मुख्य व्यावसाइक चित्रपट उत्पादन आणि वितरण, ऑडीओ आणि विडीओ केसेट, डीस्क, यांचे उत्पादन आणि वितरण, टेलीविजन सोफ्टवेअर या गोष्टींचा समावेश होता. १९९६मध्ये मध्ये कंपनीच्या सुरवातीला अरशद वारसी याची फिल्म तेरे मेरे सपने बॉक्स ऑफिसवर आदळली पण अरशद वारसी आणि सिमरन यांच्यासाठी या फिल्म मुळे चित्रपट सृष्टीची दारे उघडली. (ए.बी.सी.एल) काही चित्रपट बनवले पण ते बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. १९९७ मध्ये (ए.बी.सी.एल) द्वारे निर्मित मृतुदाता या चित्रपटातून बच्चनयांनी पुन्हा आगमन केलं त्यात त्यांनी आपली एक्शन हिरोवाली प्रतिमा पुन्हा पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केले पण ते अपयशी ठरले. १९९७मध्ये बंगलोरयेथे (ए.बी.सी.एल) ने १९९६च्या मिस वल्ड सौंदर्य प्रतियोगिता आयोजित केली पण त्यांच्या खराब आयोजनामुळे करोडो रुपयांचं नुकसान भोगावं लागलं. या घटनेमुळे (ए.बी.सी.एल) चारही बाजुनी कोर्टाच्या कारवायांमध्ये अडकली गेली. ज्या मुळे १९९७ मध्ये (ए.बी.सी.एल) आर्थिक दृष्ट्या समपुष्टात आली. नंतर (ए.बी.सी.एल) कंपनी प्रशासनाच्या हातात गेली मग भारतीय उद्योग मंडळाने तिला अयशस्वी करार दिला. एप्रिल १९९९ मध्ये उच्च न्यायालयाने बच्चन यांना त्यांचा मुंबई मधला बंगला (प्रतीक्षा) आणि दोन फ्याट विकण्यावर बंदी आणली होती. जो पर्यंत कैनरा बैकेकडून घेतलेल्या रकमेवर निर्णय होत नाही तो पर्यंत त्यांना या जागा विकता येणार नाहीत असा कोर्टाने आदेश दिला होता, पण बच्चन यांनी कोर्टाला सांगितलं कि त्यांनी हा बंगला सहारा इंडिया फाइनेंसकडे आपल्या कंपनीची आर्थिक स्थिती वाढवण्यासाठी गहाण ठेवला होता, नंतर बच्चन आपल्या अभिनय कारकिर्दीला सावरण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांनी बडे मिया छोटे मिया आणि सूर्यवंशम सारखे चित्रपट केले. ते यशस्वीहि ठरले पण तोपर्यंत लोक समजून गेले होते कि बच्चनयांची कारकीर्द आता संपुष्टात आली आहे. त्याच बरोबर लाल बादशहा, हिंदुस्तान कि कसम यान सारखे चित्रपट अयशस्वी ठरले.