Get it on Google Play
Download on the App Store

१९८२मध्ये कुली चित्रपटादरम्यान त्यांना दुखापत झाली

१९८२मध्ये कुली चित्रपटात बच्चन यांचा त्यांचा सहकलाकार पुनीत इस्सर यांच्या सोबत फाइट सीन करताना   त्यांना दुखापत झाली होती. त्यांनी स्वतःच्या मर्जीने फाइट स्वतःला हवी तशी करण्याची मुभा मागितली होती. ज्या सीन मध्ये त्यांना प्रथम एका टेबलावर पडायचं होतं आणि नंतर जमिनीवर. ज्यावेळी त्यांनी टेबलावर उडी मारली त्यावेळी टेबलाचा कोपरा त्यांच्या पोटात लागला आणि त्यांच्या आतड्यांना दुखापत झाली आणि त्यांच्या शरीरातून खूप रक्त वाहू लागलं. त्यांना लगेचच विमानाने  हॉस्पिटल मध्ये नेण्यात आलं.  ते कित्तेक  महिने हॉस्पिटल मध्ये राहिले. अनेकदा मृत्युच्या तोंडातून बाहेर आले. या दुर्घटनेत त्यांचा  मृत्यू झाल्याच्याहि अफवा उठल्या. संपूर्ण देशात त्यांच्या चाहत्यांची गर्दी त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करू लागली. या दुर्घटनेची बातमी लांब लांब पर्यंत पसरली. युके मधल्या वृत्तपत्रांमध्ये हि बातमी हेडलाइन मध्ये येऊ लागली. अनेक भारतीयांनी मंदिरात जाऊन पूजा अर्चना केली. त्यांना वाचवण्यासाठी आपल्या शरीराचे काही भाग अर्पण केले. जिथे त्यांच्यावर उपचार केले जात होते त्या हॉस्पिटल बाहेर त्यांच्या चाहत्यांच्या रांगा लागू लागल्या. यातून त्यांना बर व्हायला बरेच महिने लागले. त्या वर्षाच्या शेवटी बऱ्याच काळानंतर त्यांनी पुन्हा कामाला प्रारंभ केला. हि फिल्म १९८३ मध्ये रिलीज झाली, आणि त्यांच्या दुर्घटनेच्या प्रचारामुळे हि फिल्म बॉक्स ऑफिसवर यशश्वी ठरली. निर्देशक मनमोहन देसाई यांनी या दुर्घटनेनंतर या गोष्टीचा शेवट बदलला होता. ह्या चित्रपटात बच्चन यांना शेवटी मृत दाखवण्यात येणार होत पण या घटनेनंतर या गोष्टीचा शेवट बदलून त्यांना जिवंत दाखवण्यात आलं. त्यानंतर देसाई असं म्हणाले कि जो व्यक्ती त्याच्या खऱ्या आयुष्यात मृत्यूशी झुंज देऊन परत आला त्याला या कथेत मृत दाखवण अयोग्य ठरेल. या फिल्मच्या रिलीजच्या वेळी पहिल्या सीनच्या शेवटी फिल्म थांबवून या सीन मध्ये अभिनेत्याला दुखापत झाल्याच लिहिण्यात आलं होतं. त्यानंतर जास्त प्रमाणात औषध किंवा जास्त प्रमाणात चढवलेल्या रक्तामुळे ते मियासथीनीया आजाराने ते ग्रासले गेले. त्यांचा या आजाराने त्यांना मानसिक आणि शारीरिकरित्या कमजोर बनवल मग त्यांनी चित्रपटामध्ये काम न करण्याचा आणि राजनीति मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. हा तोच काळ होता ज्यावेळी त्यांच्या मनात चित्रपटाविषयी निराशावादी विचारधारा निर्माण झाली. प्रत्येक शुक्रवारी रिलीज होणाऱ्या चित्रपटांच्या प्रतीउत्तराबाबद ते काळजीत असायचे. प्रत्येक रिलीजच्या आधी ते नकारात्मक भूमिकेत उत्तरं देत असत कि हि फिल्म फ्लोप होणार.