Android app on Google Play

 

१९७३ – १९८३ स्टारडमकडे प्रस्थान

 

१९७३ मध्ये प्रकाश मेहरा यांनी त्यांची फिल्म जंजीर (१९७३) मध्ये इन्स्पेक्टर विजय खन्नाची भूमिका करण्याची संधी दिली त्या वेळेपासून त्यांच्या करियर मध्ये प्रगतीचा मार्ग खुला झाला. या चित्रपटामुळे त्यांची बॉलीवूडमध्ये एंग्री यंगमैन म्हणून ओळख झाली. यामुळे ते बॉलीवूडचे एक्शन हिरो म्हणून ओळखले जातात. जंजीर ही जबरदस्त अभिनय असलेली त्यांची पहिली सर्वोत्कृष्ठ फिल्म होती. या चित्रपटाने त्यांना सर्वोत्कृष्ठ पुरुष कलाकार हा फिल्मफेअर पुरस्कार मिळवुन दिला. १९७३ हा तोच साल आहे ज्या साली त्यांनी अभिनेत्री जया भादुरी यांच्याशी ३ जून रोजी विवाह केला. याचवेळी त्यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले. त्यापैकी अभिमान ही फिल्म त्यांच्या लग्नाच्या एक महिना नंतर रिलीज झाली. नंतर ह्रीषिकेश मुखर्जीच्या निर्देशनाखाली बनलेली आणि बिरेश चटर्जीने लिहिलेली फिल्म नमक हराम मध्ये त्यांना विक्रमची भूमिका मिळाली. जी फिल्म मैत्रीवर आधारित होती. राजेश खन्ना आणि रेखा व्यतिरिक्त त्यांच्या सहायक अभिनयासाठी त्यांचे खूप कौतुक झाले. त्यांना सर्वोत्कृष्ठ सहायक अभिनेता म्हणून त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९७४ मधल्या रोटी कपडा और मकान या सर्वात मोठ्या चित्रपटात सहायक अभिनेता म्हणून काम केल्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटातून पाहुणा कलाकाराचीहि भूमिका केली जसं कुवारा बाप आणि दोस्त. मनोज कुमार यांनी लिहिलेली आणि निर्देशित केलेल्या या फिल्ममध्ये भावनात्मक संघर्ष आणि इमानदारीचे चित्रण केले गेले होते हि एक सफल फिल्म होती आणि यात अमिताभ यांच्या सोबत सहकलाकार म्हणून स्वताः मनोज कुमार, शशी कपूर आणि जीनत अमान होत्या. बच्चनयांनी {६ डिसेंबर १९७४ मध्ये रिलीज झालेल्या मजबूर या फिल्म मध्ये अग्रगण्य भूमिका केली होती. हि फिल्म हॉलीवूड फिल्म जीगजेगची कॉपी करून बनवली होती, ज्यात जॉर्ज कैनडी प्रमुख भूमिकेत होते. पण बॉक्स ऑफिस वर हि फिल्म खास प्रदर्शन करू शकली नाही. १९७५ मध्ये त्यांनी हास्यावर बनलेली फिल्म चुपके चुपके, अपराधावर बनलेली फिल्म फरार आणि रोमांटीक फिल्म मिली मध्ये त्य आणि अभिनय केला. १९७५ साली त्यांनी दोन चित्रपटात भूमिका केल्या आणि हे दोन्ही चित्रपट त्या वर्षीचे सर्वात महत्वपूर्ण चित्रपट ठरले                

त्यांनी यश चोप्रा द्वारे निर्देशित दिवार या चित्रपटात प्रमुख भूमिका केली, त्यात त्यांच्या सोबत शशी कपूर, निरूपा  राय, आणि नीतू सिंग हे कलाकार होते. या चित्रपटाने त्यांना सर्वोकृष्ट अभिनेता म्हणून फिल्मफेअर पारितोषिक मिळवून दिलं. १९७५ मध्ये हि फिल्म बॉक्स ऑफिसवर हिट होऊन चौथ्या स्थानावर आली. इंडिया टाईम्सच्या २५ चित्रपटांच्या यादीत हि फिल्म आली. १५ ओगस्ट १९७५ मध्ये आलेल्या शोले या चित्रपटाने २,३६,४५,०००००/- रुपायांची कमाई केली. जे ६० मिलियन अमेरिकी डॉलर एवढे आहेत. बच्चन यांनी इंडस्ट्रीच्या काही नामांकित नट / नाट्यान  सोबत जसे धर्मेंद्र,  हेमा मालिनी, संजीव कुमार, जया बच्चन आणि अमजद खान यांच्या सोबत जयदेवची भूमिका केली आहे. १९९९मध्ये बीबीसी इंडिया ने ह्या फिल्मला शताब्दी फिल्म अस नाव दिलं. आणि दिवार सिनेमा प्रमाणे ते इतर या फिल्मलाही इंडिया टाईम्सच्या २५ चित्रपटांमध्ये सहभागी करून घेतलं. त्याच वर्षी ५० वे वार्षिक फिल्मफेअर पुरस्कार निर्नायकांनी एक विशेष पुरस्कार देण्याचे आयोजित केले ज्याचे नाव ५० वर्षापासूनची सर्वश्रेष्ठ फिल्म फिल्मफेअर पुरस्कार हे होतं. बॉक्स ऑफिसवर शोले सारख्या चित्रपटानंतर बच्चन यांनी आपली स्थिती मजबूत केली होती आणि १९७६ ते १९८४ पर्यंत त्यांनी अनेक सर्वोकृष्ठ कलाकाराचे फिल्मफेअर पुरस्कार मिळवले होते. शोले सारख्या चित्रपटांनी अगोदरच महान एक्शन नायकाचे स्थान पक्के केले होते. तरीही बच्चन यांनी सांगितलं कि ते इतर भूमिकेतही स्वतःला सिद्ध करू शकतात आणि रोमांटीक चित्रपटांमध्येही अग्रगण्य भूमिका करू शकतात. जसं कभी कभी (१९७६) आणि कॉमेडी चित्रपटांमध्ये अमर अकबर एन्थनी (१९७७) आणि त्या आधी चुपके चुपके (१९७५) मध्ये काम केलं होतं. १९७६ मध्ये यश चोप्रा यांनी बच्चन यांना त्यांची दुसरी रोमांटीक फिल्म कभी कभी मध्ये साईन केलं. त्यात बच्चन यांनी अमित मल्होत्रा नावाच्या एका तरुण कवीची भूमिका केली होती, यात त्यांच्या सोबत अभिनेत्री राखी हिने पूजा नावाच्या एका तरुण मुलीची भूमिका केली होती त्यात त्याचं एकमेकांशी प्रेम होतं. या चित्रपटामुळे त्यांना सर्वोकृष्ठ अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळला होता आणि बॉक्स ऑफिसवर सुद्धा हा चित्रपट यशस्वी ठरला. १९७७ मध्ये त्यांनी अमर अकबर एन्थनी मध्ये आपल्या अभिनयामुळे त्यांना सर्वोत्कृष्ठ फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. या चित्रपटात त्यांनी विनोद खन्ना, ऋषी कपूर, यांच्या सोबत एन्थनी गोन्साल्विज नावाची तिसरी अग्रगण्य भूमिका निभावली. १९७८ हे त्यांचा आयुष्यातील प्रगतशील वर्ष होत कारण त्यावेळी एकापाठोपाठ एक अशा चार चित्रपटानंमध्ये त्यांनी स्टार कलाकाराची भूमिका केली होती. त्यांनी कस्मे वादे सारख्या चित्रपटात अमित आणि शंकर, डॉन मध्ये अंडरवर्ल्ड गेंग आणि त्याच्या सारख्या चेहेरा असलेल्या विजयची दुहेरी भूमिका केली. त्यांच्या या अभिनयामुळे त्यांना सर्वोकृष्ठ अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. आणि त्यांच्या चाहत्यांनी त्रिशूल आणि मुकद्दर का सिकंदर मध्ये त्यांची खूप प्रशंसा केली. त्यांच्या या अभिनयामुळे त्यांना सर्वोकृष्ठ अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. या यशामुळे फ्रेन्काइज तृफोट नामक एका निर्देशाकाने त्यांना वन मेन इंडस्ट्रीच नाव दिलं. १९७९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा मिस्टर नटवरलाल नावाच्या चित्रपटात त्यांची सहयोगी रेखा सोबत काम करत असताना गाण गाताना त्यांना स्वतःच्या आवाजाचा उपयोग करावा लागला. चित्रपटातील त्याच्या प्रदर्शनामुळे त्यांना सर्वोत्कृष्ठ अभिनेता आणि पार्श्वगायक पुरुष यासाठी सर्वोत्कृष्ठ फिल्म पुरस्कार मिळाला. १९७९ मध्ये त्यांना काला पत्थर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला. त्यानंतर १९८० मध्ये राज खोसला द्वारे निर्देशित चित्रपटात त्याचं नामांकन झाल त्यात त्यांच्या सोबत शत्रुघ्न सिन्हा आणि जीनत अमान होत्या, दोस्ताना हि १९८० मधली नामांकित फिल्म ठरली. १९८१ मध्ये त्यांनी यश चोप्रा यांच्या सिलसिला या चित्रपटात काम केलं. या चित्रपटात त्यांची सहकलाकार त्यांची पत्नी जया आणि अफवांमध्ये त्यांची प्रियासी रेखा हि होती. या काळातील चित्रपटांमध्ये राम बलराम, शान (१९८०), लावारिस (१९८१), शक्ती (१९८२), या चित्रपटांचा समावेश होता, ज्यामुळे दिलीप कुमार सारख्या अभिनेत्याशी त्यांची तुलना होऊ लागली.