ऑलिम्पिक्स
सन १९१२ ते १९४८ पर्यंत समर ऑलिम्पिक्स मध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक हे केवळ खेळांपुरत मर्यादित नव्हतं तर वास्तुकला, साहित्य, संगीत, कला आणि शिल्पकला या प्रकारांमधेही दिलं जायचं. १९४८ च्या समर ऑलिम्पिक्स मध्ये स्विट्ज़रलैंड च्या अलेक्स दिग्गेलमन ने एकाच स्पर्धेत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी तीनही पदकं जिंकून विक्रम केला होता. हा विक्रम अजूनपर्यंत कोणीही मोडू शकलं नाहीये.