Android app on Google Play

 

विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 7

ब्रह्मदेव

२८.  अशा रीतीनें इन्द्र मागें पडत गेला. पण बुद्धसमकालीं ब्रह्मा पुढें आला. ऋग्वेदांत ब्रह्म म्हणजे प्रार्थनेचा मंत्र, व तें गाणारा तो ब्रह्मा. होतां होतां यज्ञाच्या अध्यक्षाला ब्रह्मा म्हणण्याची वहिवाट सुरू झाली. ( ‘एवंविद्ध वै ब्रह्मा यज्ञं यजमानं सर्वोंश्चार्त्विजोsभिरक्षति तस्मादेवंविदमेव ब्रह्माणं कुर्वीत!’ छांदोग्य उ० ४।१७।१०). इंद्राचें साम्राज्य नष्ट झाल्यावर त्याचें महत्व राजे लोकांत राहिलें नसल्यामुळें ब्राह्मणांनी ह्या ब्रहम्याला वरच्या पायरीला चढवतां चढवतां जगाचा कर्ता बनवलें. (ब्रह्मा देवानां प्रथम: संबभूव विश्वस्य कर्ता भुवनस्य गोप्ता | मुण्डक उ० १।१). परंतु ह्या कल्पनेला कोणत्याहि महाराजाचा पाठिंबा न मिळाल्यामुळें ब्रह्मा चिरकाल ह्या अधिकारावर राहूं शकला नाहीं. बौद्ध श्रमणांनी तर त्याची नुसती थट्टाच उडवलीं. त्याच्यासंबंधाने बौद्ध वाङ्मयांत बर्‍याच कथा उपलब्ध आहेत. त्यापैकीं कांहीं येथें देणें अप्रस्तुत होणार नाहीं.

२९.  “एकदां एका भिक्षूला असा विचार पडला कीं, पृथ्वी, आप, तेज व वायु हीं महाभूतें कोठें विलय पावतात? त्याला हा प्रश्न सुटेना. तेव्हां तो चातुर्महाराजिक देवांजवळ गेला. त्यांनाहि हा प्रश्न माहीत नव्हता. त्यांनी त्या भिक्षूला चार महाराजांपाशीं पाठविलें. चार महाराजांनाहि त्याच्या प्रश्नाचें उत्तर देतां आलें नाहीं. त्यांनी त्याला तावत्र्रिंशत् देवांकडे, त्यांनी इन्द्राकडे, इन्द्रानें याम देवांकडे, यामांनी त्याला सुयाम नांवाच्या आपल्या अध्यक्षाकडे, त्यानें तुसित देवांकडे. तुसित देवांनी संतुसित नांवाच्या आपल्या अध्यक्षाकडे, त्यानें निर्माणरति देवांकडे, त्यांनी आपल्या सुनिर्मित नांवाच्या अध्यक्षाकडे, त्यानें परनिर्मितवशवर्ती देवांकडे, त्यांनी आपल्या अध्यक्षाकडे पाठविलें, व त्या अध्यक्षानें त्याला ब्रह्मकायिक देवांकडे पाठविलें.

३०.  “त्यांनाहि हा प्रश्न ठाऊक नव्हता. ते म्हणाले, ‘आम्हाला तुझ्या प्रश्नाचें उत्तर देतां येत नाहीं. परन्तु आमचा महाब्रह्मा हा प्रश्न सोडवूं शकेल.’ भिक्षु म्हणाला, ‘पण तो सध्या कोठें आहे?’ ब्रह्मकायिक म्हणाले, ‘तें आम्हाला ठाऊक नाहीं. पण अशी चिन्हें दिवसात कीं, ब्रह्मा येथें प्रगट होईल; कारण आलोक आणि अवभास दिसत आहे.’

३१.  “इतक्यांत ब्रह्मा तेथें प्रगट झाला. तेव्हां त्या भिक्षूनें हा प्रश्न त्याला विचारला. त्यावर ब्रह्मा म्हणाला, ‘मी ब्रह्मा आहें; अभिभू, अनभिभूत, सर्वदर्शी, वशवर्ती ईश्वर, कर्ता, निर्माता, श्रेष्ठ, सर्जिता, वशी आणि भूत-भविष्य प्राण्यांचा पिता आहें.’ भिक्षु म्हणाला, ‘पण हें विचारण्यासाठीं मी आलों नाहीं. पृथ्वी, आप, तेज व वायु हीं चार महाभूतें पूर्णपणें कोठें विलय पावतात, हा माझा प्रश्न आहे.’

३२.  “महाब्रहम्यानें आपल्या भाषणाची पुनरुक्ति केली. पण त्यामुळें भिक्षूचें समाधान न होतां भिक्षूनें तोच प्रश्न पुन्हा विचारला. असें तीनदां घडलें. चौथ्या वेळी जेव्हां भिक्षूनें तो प्रश्न विचारला, तेव्हां ब्रह्मदेवानें त्या भिक्षूला हाताला धरून एक बाजूला नेलें, व तो म्हणाला, ‘हे भिक्षु, हे जे ब्रह्मकायिक देव आहेत ते समजतात कीं, मला अज्ञात अशी वस्तु नाहीं, मी पाहिली नाहीं अशी वस्तु नाही. तेव्हां त्यांच्यासमोर मला हें सांगतां आलें नाहीं कीं, हा तुझा प्रश्न मला माहीत नाहीं. भगवंताला सोडून तूं माझ्याकडे आलास, हा तुझा अपराध आहे; हें तुझें अकृत्य आहे. आतां तूं त्या भगवंताजवळ जा, व त्याला हा प्रश्न विचार, आणि तो जें उत्तर देईल तें योग्य असें समज.” १
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ दीघनिकाय, केवट्टसुत्त.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हिन्दी संस्कृति आणि अहिंसा

धर्मानंद कोसंबी
Chapters
विभाग पहिला - वैदिक संस्कृति 1
विभाग पहिला - वैदिक संस्कृति 2
विभाग पहिला - वैदिक संस्कृति 3
विभाग पहिला - वैदिक संस्कृति 4
विभाग पहिला - वैदिक संस्कृति 5
विभाग पहिला - वैदिक संस्कृति 6
विभाग पहिला - वैदिक संस्कृति 7
विभाग पहिला - वैदिक संस्कृति 8
विभाग पहिला - वैदिक संस्कृति 9
विभाग पहिला - वैदिक संस्कृति 10
विभाग पहिला - वैदिक संस्कृति 11
विभाग पहिला - वैदिक संस्कृति 12
विभाग पहिला - वैदिक संस्कृति 13
विभाग पहिला - वैदिक संस्कृति 14
विभाग पहिला - वैदिक संस्कृति 15
विभाग पहिला - वैदिक संस्कृति 16
विभाग पहिला - वैदिक संस्कृति 17
विभाग पहिला - वैदिक संस्कृति 18
विभाग पहिला - वैदिक संस्कृति 19
विभाग पहिला - वैदिक संस्कृति 20
विभाग पहिला - वैदिक संस्कृति 21
विभाग पहिला - वैदिक संस्कृति 22
विभाग पहिला - वैदिक संस्कृति 23
विभाग पहिला - वैदिक संस्कृति 24
विभाग पहिला - वैदिक संस्कृति 25
विभाग पहिला - वैदिक संस्कृति 26
विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 1
विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 2
विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 3
विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 4
विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 5
विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 6
विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 7
विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 8
विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 9
विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 10
विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 11
विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 12
विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 13
विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 14
विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 15
विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 16
विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 17
विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 18
विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 19
विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 20
विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 21
विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 22
विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 23
विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 24
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 1
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 2
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 3
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 4
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 5
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 6
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 7
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 8
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 9
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 10
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 11
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 12
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 13
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 14
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 15
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 16
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 17
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 18
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 19
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 20
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 21
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 22
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 23
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 24
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 25
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 26
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 27
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 28
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 29
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 30
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 31
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 32
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 33
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 34
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 35
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 36
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 37
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 38
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 39
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 40
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 41
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 42
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 43
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 44
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 45
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 46
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 47
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 48
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 49
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 50
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 51
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 52
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 53
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 54
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 55
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 56
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 57
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 58
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 59
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 60
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 61
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 62
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 63
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 64
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 65
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 66
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 67
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 68
विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 69
विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 1
विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 2
विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 3
विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 4
विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 5
विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 6
विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 7
विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 8
विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 9
विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 10
विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 11
विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 12
विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 13
विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 14
विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 15
विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 16
विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 1
विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 2
विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 3
विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 4
विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 5
विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 6
विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 7
विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 8
विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 9
विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 10
विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 11
विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 12
विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 13
विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 14
विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 15
विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 16
विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 17
विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 18
विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 19
विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 20
विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 21