विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 3
इन्दो सोमो वरुणो च भारद्वाजो पजापति |
चन्दनो कामसेट्ठो च किन्नुघण्टु निघण्टु च ||
पमादो ओपमञ्ञो च देवसूतो च मातलि ||
चित्तसेनो च गन्धब्बो नळो राजा जनेसभो ||
सातागिरि हेमवतो पुण्णको करतियो गुलो ||
सिवको मुचलिन्दो च वेस्सामित्तो युगन्धरो ||
गोपालो सुप्पगेधो च हिरि नेत्ति च नन्दियो ||
पञ्चालचन्दो आळवको पज्जुण्णो सुमुखो दधिमुखो |
मणि मानिचरो दीघो अथो सेरीसको सह ||
“ही रक्षा सांगून त्या चार महाराजांनी भगवंताला अभिवादन करून प्रदक्षणा केली, व ते तेथेंच अंतर्धान पावले. त्या रात्रीनंतर भगवंतानें घडलेली सर्व गोष्ट भिक्षूंना सांगितली व ही आटानाटिय रक्षा धारण करावी, असा उपदेश केला भिक्षूंनी भगवंताच्या भाषणाचें अभिनंदन केलें.”
यक्षादिकांसंबंधानें ज्या गोष्टी त्रिपिटक वाङ्मयांत सांपडतात त्यांचें दिग्दर्शनहि करणें शक्य नाहीं. कारण तो एक मोठा ग्रंथच होईल. पण बुद्धाच्या शिष्यांचें धोरण समजण्यास वरील दोन उतारे पुरे आहेत. ख्रिस्ती किवा मुसलमान धर्मप्रचारकांनी जसा इतरांच्या देव-देवतांचा नाश केला, तसा बुद्धाच्या शिष्यांनी केला नाहीं. देवता आळवक यक्षाप्रमाणे हिंसक असल्या, तर त्यांना अहिंसक बनवावें आणि बु्द्धभक्त करावें, असा त्यांचा प्रयत्न होता. आणि तिबेट, ब्रह्मदेश, सयाम इत्यादि देशांत जेथें बौद्ध धर्माचा प्रसार अव्याहतपणें झाला, तेथें तो उत्तम प्रकारें सिद्धीस गेला. परंतु हिंदुस्थानांत बौद्ध धर्माच्या विरुद्ध वैदिक धर्म खडा होता; व तो हिंसाधर्माला फांटा देण्यास तयार नव्हता. अर्थात् ह्या देशांत हिंसक आणि अहिंसक अशा दोन्ही प्रकारच्या देवता राहून गेल्या. आणि ह्या देवतांच्या पूजनापासूनच पौराणिक संस्कृतीचा उगम झाला.